ETV Bharat / state

परळी पोलिसांनी पकडला ३५ लाखांचा गुटखा; खरे सूत्रधार मोकाटच

गुटख्याचा ट्रक उतरून घेत असताना परळी शहर पोलिसांनी चालकासह ट्रक ताब्यात घेतला आहे. ही कारवाई आज पहाटे परळी शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत करण्यात आली.पकडलेल्या ट्रकमध्ये अंदाजित 35 लाख रुपयांचा गुटखा आहे.

जप्त केलेला जप्त
author img

By

Published : Sep 9, 2019, 12:55 PM IST

बीड- गुटख्याचा ट्रक उतरून घेत असताना परळी शहर पोलिसांनी चालकासह ट्रक ताब्यात घेतला आहे. ही कारवाई आज पहाटे परळी शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत करण्यात आली.पकडलेल्या ट्रकमध्ये अंदाजित 35 लाख रुपयांचा गुटखा आहे. मागील आठवड्यापासून बीड पोलिसांनी अवैध गुटखा विक्री विरोधात मोहीम सुरू केली आहे. मात्र, अद्यापही गुटखा विक्रीतील सूत्रधार मोकाट आहेत.

परळी पोलिसांनी पकडला ३५ लाखांचा गुटखा

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, परळी शहरातील वडसावित्री रोड मलिकपुरा येथे ट्रक क्रमांक (एम एच १४ ई एम 9773) मधून गुटख्याच्या पिशव्या उतरल्या जात असल्याची माहिती अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या पिशव्या उतरून पत्र्याच्या शेडमध्ये ठेवल्या जात होत्या. पोलिसांना पाहताच गुटखा उतरून घेणारे कामगार पळून गेले. यादरम्यान, ट्रकचा चालक व्यंकटी लक्ष्मण फड (रा. गंगाखेड, जि. परभणी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा - तीन महिन्यांपासून 'हे' गाव अंधारातच; ग्रामस्थांची हेळसांड

कसून चौकशी केली असता व्‍यंकटी फड याने सांगितले की, या ट्रकमध्ये सोलापूर येथून गुटखा भरून आणलेला आहे. काही गुटख्याच्या पिशव्या गाडीत आहेत. तर काही पत्र्याच्या शेडमध्ये टाकलेले आहेत. पोलिसांनी पकडलेला सर्व गुटख्याची मोजदाद केली असता सुमारे ३५ लाख रुपयांचा गुटखा असल्याचे पोलिसांनी सांगितले. अन्नभेसळ अधिकारी यांना पत्रव्यवहार केला असल्याचेही परळी पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मेंडके, बांगर, तोटेवाड यांनी केली आहे.

हेही वाचा - मोलकरणीचा वृद्ध महिलेवर हल्ला; दागिने घेऊन पसार

Intro:परळी पोलिसांनी पकडला 35 लाखाचा गुटखा; गुटका विक्रीतील खरे सूत्रधार मोकाटच

बीड- गुटख्याचा ट्रक उतरून घेत असताना परळी शहर पोलिसांनी चालकासह ट्रक ताब्यात घेतला आहे. ही कारवाई सोमवारी पहाटे परळी शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत करण्यात आली.पकडलेल्या ट्रक मध्ये अंदाजित 35 लाख रुपयांचा गुटखा आहे. मागील आठवड्यापासून बीड पोलिसांनी अवैध गुटखा विक्री विरोधात मोहीम सुरू केली आहे मात्र अद्यापही गुटका विक्रीतील सूत्रधार मोकाट आहेत. ही वस्तुस्थिती आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, अंबाजोगाई उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून परळी शहर पोलिसांनी सोमवारी पहाटे परळी शहरातील वडसावित्री रोड मलिकपुरा, परळी येथे ट्रक क्रमांक (एम एच-em-14- 9773) मधून गुटख्याच्या पिशव्या उतरल्या जात आहेत ही माहितीमिळताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली असता, ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या पिशव्या उतरल्या उतरून पत्र्याच्या शेडमध्ये ठेवल्या जात होत्या, पोलिसांना पाहताच गुटका उतरून घेणारे कामगार पळून गेले यादरम्यान ट्रकचा चालक व्यंकटी लक्ष्मण फड (ता. गंगाखेड जि. परभणी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सविस्तर विचारणा केली असता व्‍यंकटी फड याने सांगितले की, या ट्रकमध्ये सोलापूर येथून गुटका भरून आणलेला आहे. काही गुटख्याच्या पिशव्या गाडीत आहेत तर काही पत्र्याच्या शेडमध्ये टाकलेले आहेत. पोलिसांनी पकडलेला सर्व गुटख्याची मोजदाद केली असता सुमारे 35 लाख रुपयांचा गुटखा असल्याचे पोलिसांनी सांगितले. अन्नभेसळ अधिकारी यांना पत्रव्यवहार केला असल्याचेही परळी पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मेंडके, बांगर, तोटेवाड यांनी केली आहे.

Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.