बीड - बीड शहरासह तालुक्याच्या ठिकाणी क्रिकेटवर सट्टा लावणारे एक मोठे रॅकेट सक्रिय आहे. परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी क्रिकेटवर सट्टा लावणारी एक टोळी गजाआड केली असून पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
क्रिकेटवर सट्टा लावून तरुणांना कंगाल करणारे मोठे रॅकेट बीड जिल्ह्यात सक्रिय आहे. परळी येथील खंडोबा मंदिर परिसरामध्ये सट्टा सुरू असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर रात्री अकरा वाजता त्या ठिकाणी धाड टाकून पाच जणांना अटक करण्यात आली. या लोकांकडून 1 लाख 76 हजार 500 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. यामध्ये नंदीग्राम पवार याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
उद्योजक तरुणांचा असतो यामध्ये सहभाग-
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, सध्या आयपीएल क्रिकेट सुरू आहे. यादरम्यान बीड जिल्ह्यातील तरुणांना क्रिकेटवर सट्टा लावण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या सट्टेबाजीमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करून एका दिवसात उलाढाल केली जाते. गेल्या काही दिवसांपासून आयपीएल टुर्नामेंट सुरू आहे. आयपीएलच्या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. खंडोबा मंदिर परिसराच्या बाजुला आयपीएलवर सट्टा लावला जात असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. या जुगार्यांकडून 1 लाख 76 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.