ETV Bharat / state

बीड तिहेरी हत्याकांड प्रकरण: कल्पेश पवनेला ७ दिवसांची पोलीस कोठडी - स्थानबद्धता

बीड येथील वासनवाडी परिसरात झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी कल्पेश पवने याला आज रविवारी (दि. २८) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ७ दिवसांची म्हणजेच ३ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बीड तिहेरी हत्याकांड प्रकरण
author img

By

Published : Jul 28, 2019, 7:24 PM IST

बीड - येथील वासनवाडी परिसरात झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी कल्पेश पवने याला आज रविवारी (दि. २८) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ७ दिवसांची म्हणजेच ३ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील इतर २ आरोपींना तात्पुरते स्थानबद्ध करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

बीड तिहेरी हत्याकांड प्रकरण

बीड जवळील वासनवाडी येथे शनिवारी एकाच कुटुंबातील ३ भावांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी किसन पवने, कल्पेश पवने आणि डॉ. सचिन पवने यांना अटक केली होती. यातील कल्पेश पवनेला रविवारी दहावे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कदिर अहमद सरवरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकारी भास्कर सावंत यांनी आरोपीला १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपीच्या वतिने विधिज्ञ शहाजी जगताप यांनी पोलीस कोठडीच्या मागणीला विरोध करत इतकी प्रदिर्घ पोलीस कोठडी आवश्यक नसल्याचे सांगितले. तसेच आरोपीला वैद्यकिय मदतीची गरज असल्याचे सांगितले. यावर तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला रुग्णालयातून सुटी झाली असून गरज पडल्यास पुन्हा तपासणी करण्यात येईल, असे न्यायालयाला सांगिलते. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपी कल्पेशला ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दोघांची तात्पुरती स्थानबद्धता

या प्रकरणातील इतर आरोपी सचिन आणि किसन जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या तात्पुरत्या स्थानबद्धतेची विनंती पोलीसांनी न्यायालयात केल्यानंतर न्यायालयाने ही मागणी मंजूर केली.

२७ वकिलांनी घेतले वकिलपत्र

या प्रकरणातील एक आरोपी कल्पेश हा वकिल आहे. त्याच्या बाजूने बीड बार कौन्सीलमधील तब्बल २७ वकिलांनी वकिलपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Intro:बीड मधील तिहेरी हत्याकांड प्रकरण; कल्पेश पवनेला ७ दिवसांची पोलीस कोठडी

बीड- येथील वासनवाडी परिसरात झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी कल्पेश पवने याला रविवारी (दि. २८) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ७दिवसांची (दि. ३ आँगस्ट पर्यंत ) पोलीस कोठडी सुनावली. तर या प्रकरणातील इतर दोन आरोपींना तात्पुरते स्थानबद्ध करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

बीड जवळील वासनवाडी येथे शनिवारी एकाच कुटुंबातील तीन भावांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलीसांनी किसन पवने, कल्पेश पवने आणि डॉ. सचिन पवने यांना अटक केली होती. यातील कल्पेश पवनेला रविवारी दहावे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कदिर अहमद सरवरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकारी भास्कर सावंत यांनी आरोपीला १० दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपीच्या वतिने विधिज्ञ शहाजी जगताप यांनी पोलीस कोठडीच्या मागणीला विरोध करत इतकी प्रदिर्घ पोलीस कोठडी आवश्यक नसल्याचे सांगितले तसेच आरोपीला वैद्यकिय मदतीची गरज असल्याचे सांगितले. यावर तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला रुग्णालयातुन सुटी झाली असुन गरज पडल्यास पुन्हा तपासणी करण्यात येईल असे न्यायालयाला न्यायालयाने आरोपी कल्पेशला ३ आँगस्टपर्यंत पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दोघांची तात्पुरती स्थानबध्दता
या प्रकरणातील इतर आरोपी सचिन आणि किसन जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या तात्पुरत्या स्थानबध्दतेची विनंती पोलीसांनी न्यायालयाला केल्यानंतर न्यायालयाने सदर टीडीओ मंजुर केला.

२७ वकिलांनी घेतले वकिलपत्र
या प्रकरणातील एक आरोपी कल्पेश हा वकिल आहे. त्याच्या बाजुने बीड बार मधिल तब्बल २७ वकिलांनी वकिलपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.