ETV Bharat / state

बीडमध्ये लॉकडाऊन कायम, कुठलाही नवीन आदेश नाही - lockdown in beed

सध्या बीड जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर नगर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. असे असले तरीही बीडमध्ये लॉकडाऊन सतर्कतेने पाळले जात असल्याचे पाहायला मिळाले.

no new rule in lock down at Beed District
बीडमध्ये लॉकडाऊन कायम, कुठलाही नविन आदेश नाही
author img

By

Published : Apr 20, 2020, 1:04 PM IST

बीड - कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सद्य परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन संदर्भात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, बीड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथीलता राहणार नाही. कारण, हजारो ऊसतोड मजूर जिल्ह्यात दाखल होतील. त्यामुळे लॉकडाऊन शिथिलता दिली तर, अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासाने कोणतेही आदेश काढले नाहीत. तसेच, जिल्ह्यातील लॉकडाऊन स्थिती 'जैसे थे' च राहणार आहे.

बीडमध्ये लॉकडाऊन कायम, कुठलाही नविन आदेश नाही

सध्या बीड जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर नगर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत, असे असले तरीही बीडमध्ये लॉकडाऊन सतर्कतेने पाळले जात असल्याचे पाहायला मिळाले. मेडिकल वगळता इतर कुठलेही व्यवसाय सुरू नव्हते. येत्या तीन-चार दिवसात इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. या गर्दीमध्ये पुन्हा येथील नागरिकांची गर्दी नको, म्हणून जिल्हा प्रशासनाने सोमवारी १२ वाजेपर्यंत कुठलाही आदेश काढलेला नाही. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना विचारले असता, त्यांनी बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन संदर्भात कुठलाही बदल नसल्याचे सांगितले आहे.

नागरिकांनी घरात बसूनच सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.