ETV Bharat / state

तीन महिन्यांपासून 'हे' गाव अंधारातच; ग्रामस्थांची हेळसांड - Beed news

मागील तीन महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील कुक्कडगाव गाव अंधारातच आहे. यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

महावितरण
author img

By

Published : Sep 7, 2019, 12:46 PM IST

Updated : Sep 7, 2019, 3:13 PM IST

बीड - मागील तीन महिन्यांपासून बीड तालुक्यातील कुक्कडगाव हे अंधारातच आहे. ऐन गौरी गणपतीच्या सणाला गावात वीज नसल्याने सणासुदीला गावकऱ्यांची हेळसांड होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार महावितरणला निवेदने दिली. मात्र, याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तीन महिन्यांपासून 'हे' गाव अंधारातच

अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या कुक्कडगाव येथे सबस्टेशन आहे. या सबस्टेशनमधून आसपासच्या गावांना सुरळीत वीजपुरवठा होतो. मात्र, कुक्कडगावातच तीन महिन्यांपासून वीज नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तसेच सरपंच वचिष्ट कुठे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुक्कडगाव येथील नागरिक सूर्यभान खंडागळे व नंदू शिंदे या ग्रामस्थांनी म्हटले आहे, की बीड येथे जाऊन महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तरीही कुक्कडगावच्या वीज पुरवठ्याच्या प्रश्नाकडे महावितरण याकडे लक्ष देत नाही. वीज नसल्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करवा लागत आहे. शेतात पाणी सोडण्यासाठी पंप सुरू होत नाही.

हेही वाचा - बीडमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा स्वत:हून ठाण्यात

दळण आणण्यासाठी पाच किलोमीटरची पायपीट

कुक्कडगाव येथे मागील तीन महिन्यांपासून वीज पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दळण आणण्यासाठी देखील चार ते पाच किलोमीटर जावे लागत आहे. याशिवाय मोबाईल चार्जिंग करण्याची व्यवस्था देखील उपलब्ध नाही.

अन्यथा तीव्र आंदोलन करू

वारंवार महावितरणकडे वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ग्रामस्थांकडून निवेदने देण्यात आली. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडेही तक्रारी केल्या. मात्र, याकडे महावितरण अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. याकडे महावितरण विभागाने विशेष लक्ष द्यावे, अन्यथा पुढील दोन दिवसात तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

महावितरण विभागाकडून ठराविक कारण

कुक्कडगाव येथील नागरिक महावितरणकडे सुरळीत वीज पुरवठ्याबाबत मागणी करण्यासाठी गेले असता त्यांना ट्रान्सफार्मर जळाले असल्याचे उत्तर महावितरण विभाग देत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा - शिवसंग्रामचा एकमेव शिलेदार भाजपच्या जाळ्यात, विनायक मेटेंना धक्का

Intro:बातमीसोबत बाईट - सूर्यभान खंडागळे व नंदू शिंदे या ग्रामस्थांचा बाईट आहे...

तीन महिन्यापासून या गावाला मिळेना वीज; ऐन सणासुदीत ग्रामस्थांची हेळसांड

आम्ही माणस आहोत जनावरं नाही; तीन महिन्यापासून अंधारात असलेल्या ग्रामस्थांची हेळसांड

बीड- चक्क मागील तीन महिन्यापासून अडीच हजार लोकवस्तीचं गाव अंधारात आहे. सणासुदीच्या काळात येथील ग्रामस्थांना विना विजेचे रहावे लागत आहे. एवढेच नाही तर गुरुवारी गौरी (महालक्ष्मी) चे अगमन झाले. गावकऱ्यांनी अक्षरशः अंधारातच महालक्ष्मी बसवल्या. वारंवार महावितरण विभागाला निवेदन देऊनही गावातील वीज पुरवठा सुरळीत होत नाही. अशा परिस्थितीत जगायचं कसं असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. महावितरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे

बीड तालुक्यातील कुकडगाव येथील ही परिस्थिती आहे. साधारणतः कुक्कडगाव ची लोकसंख्या अडीच हजार एवढी आहे. वारंवार महावितरण विभागाकडे विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत अर्ज करून देखील कुकडगाव येथे तीन महिन्यापासून वीज मिळत नाही. विशेष बाब म्हणजे कुक्कडगाव येथे सबस्टेशन आहे. कुक्कडगावच्या शिवारात असलेल्या सबस्टेशन वरुन आजूबाजूच्या गावात वीज पुरवठा केला जातो. मात्र या पासून कुकडगाव जवळअसूनही गाव अंधारात असल्याने येथील सरपंच वचिष्ट कुठे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुकडगाव येथील नागरिक सूर्यभान खंडागळे व नंदू शिंदे या ग्रामस्थांनी म्हटले आहे की, बीड येथे जाऊन महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन देखील कुक्कडगाव च्या वीज पुरवठा पुरवठा चा प्रश्न लागत नाही. अशा परिस्थितीत आम्ही जगायचं कसं? असा प्रश्न कुक्कडगाव येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

दळण आणण्यासाठी जावा लागते पाच किलोमीटर-

कुकडगाव येथे मागील तीन महिन्यापासून वीज पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दळण आणण्यासाठी देखील चार ते पाच किलोमीटर जाऊन आणावे लागत आहे. याशिवाय मोबाईल चार्जिंग करण्याची व्यवस्था देखील उपलब्ध नाही. एवढी वाईट परिस्थिती कुक्कडगाव येथील नागरिकांवर ओढावली आहे. याकडे महावितरण विभागाने विशेष लक्ष द्यावे, अन्यथा पुढील दोन दिवसात तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

महावितरण विभागाकडून सांगितली जातात ही कारणे-

जमा जमा कुकडगाव येथील नागरिक महावितरण कडे सुरळीत विद्युत पुरवठा बाबत मागणी करण्यासाठी गेले असता त्यांना ट्रांसफार्मर जळाली असल्याचे उत्तर महावितरण विभाग देत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.Body:बConclusion:ब
Last Updated : Sep 7, 2019, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.