बीड - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सोमवारी दिवसभरात एकूण 56 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आता 958 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 55 टक्के पेक्षा अधिक असले तरी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे बीडकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
बीड जिल्ह्यातून सोमवारी पाठवलेल्या स्वॅबपैकी सोमवारी रात्री प्रशासनाला 348 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 56 रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 284 निगेटिव्ह तर 8 अनिर्णित असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड 11, परळी 16, गेवराई 2 , अंबाजोगाई 7 , माजलगाव 8 , धारूर 5 , केज 6, पाटोदा 1 अशी रुग्ण संख्या आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 958 वर पोहोचली आहे. यापैकी पावणे चारशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. आज घडीला बीड जिल्ह्यात 800 हून अधिक खाटांची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
आतापर्यंत केवळ शहरी भागांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
बीड जिल्ह्यात आढळले नवे 56 कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या पोहोचली 958 वर - beed corona patient news
जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 958 वर पोहोचली आहे. यापैकी पावणे चारशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. आज घडीला बीड जिल्ह्यात 800 हून अधिक खाटांची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे.