ETV Bharat / state

परळीत 50 ऑक्सिजन बेडच्या कोविड केअर सेंटरचे मंत्री मुंडेंच्या हस्ते उद्घाटन - परळी बातमी

परळी येथील ग्रामीण रुग्णालयात आज (दि. 3 मे) पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 50 ऑक्सिजन बेडच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.

बीड
बीड
author img

By

Published : May 3, 2021, 3:07 PM IST

परळी (बीड) - येथील ग्रामीण रुग्णालयात आज (दि. 3 मे) पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 50 ऑक्सिजन बेडच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. येथे आजपासून 25 ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात आले असून, आणखी 25 बेडला ऑक्सिजन सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

बोलताना मंत्री मुंडे

धनंजय मुंडे यांनी यावेळी वॉर्डांमध्ये जाऊन उपलब्ध सुविधांची पाहणी केली. रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेत कोणताही रुग्ण सिरीयस होण्याआधी इथेच योग्य उपचार मिळावेत, यासाठी गरज भासल्यास परळीतील खाजगी डॉक्टर्सची काही तासांसाठी सेवा उपलब्ध करून घेऊ, असे यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्षद शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश कुर्मे, पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये, तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण मोरे, नायब तहसीलदार रुपनर यांसह आदी उपस्थित होते.

रुग्णालयात 50 रुग्णांना एकाच वेळी सेवा देण्याच्या प्रमाणात पॅरा मेडिकल स्टाफ उपलब्ध करण्यात आला आहे. त्यांना आवश्यक सामग्री, पीपीई किट व अन्य साहित्याची कमतरता भासणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश डॉ. गित्ते यांना मुंडे यांनी दिले. तर रुग्णालयात आजपासून 25 रुग्ण दाखल होतील त्यांच्या नातेवाईकांची गर्दी होऊ नये यासह अन्य सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश, मंत्री मुंडे यांनी यावेळी पोलीस उपअधीक्षक जायभाये यांना दिले.

हेही वाचा - बीडमध्ये २४ तासात दोन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू; आतापर्यंत सात जणांनी गमावले प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.