ETV Bharat / state

huge electricity bill in : महावितरणचा भोंगळ कारभार; गरीब शेतकऱ्यांवर हजारोंच्या बीज बिलाचा मारा

बीड तालुक्यात महावितरणचा भोंगळ कारभार समोर आला ( Mahavitran Poor administration ) आहे. वाढीव वीज बिलाने गावातील नागरिक संतप्त झाले ( huge electricity bill sent beed farmers ) आहेत. उजेडात राहण्यापेक्षा अंधारच बरा अशी परिस्थीती नागरिकांची झाली आहे.

electricity bill
वीज बिलाने गाव पीडित
author img

By

Published : Jan 9, 2023, 2:49 PM IST

वीज बिलाने गाव पीडित

बीड : महावितरणच्या गलथान कारभारामुळे बीड तालुक्यातील 12 हजार नागरिकांना रीडिंग न घेता अंदाजे जास्तीच्या वीज बिलाचा शॉक दिला जात ( Mahavitran Poor administration ) आहे. जास्तीच्या वीज बिलाने त्रस्त झालेल्या या खंडाळा गावातील नागरिकांनी आपली व्यथा मांडली ( huge electricity bill sent beed farmers ) आहे. अंधारात राहू तुमचे बिलही नको आणि लाईट नको अशी भावना ग्रामस्थांनी मांडली. त्यामुळे वाढीव वीज बिलाचा शॉक, ग्राहक घायाळ अशी एकूण परिस्थीती बीडच्या खंडाळा गावात निर्माण झाली आहे. विजेची आकडे टाकून चोरी करणाऱ्या लोकांना मात्र महावितरणचे पाठबळ आहे. आम्ही तुमचे मिटर घेऊन चुक केलीय का असा सवाल संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत.

रीडिंग घेणारे आणि कंत्राटदार यांची मिली भगत : महावितरणचे अधिकारी आणि रीडिंग घेणारी कंत्राटदार यांची मिली भगत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घरात दोनच विजेचे बल्प आहेत. मात्र बिल 34,000 आले असल्याचे ग्रामस्थांनी ( Mahavitran cheat Poor farmers ) सांगितले. मजुरी करणाऱ्या कुटुंबाने एवढे मोठे बील भरायचे कसे असाच प्रश्न आता त्या नागरिकांपुढे आहे. सहा महिन्यापूर्वी बसवलेल्या मीटरला प्रत्येक महिन्याला पाच हजार बिल येत आहे. अंदाजे वीज बिल येत असल्याने या वाढीव विज बिलाचा शॉक 12,000 ग्राहकांना बसलाय महावितरणचे डोके ठिकाणावर आहे का...? अशी चर्चा सर्व सामान्य नागरिकांत होत आहे. मीटर रीडिंग न घेता तिरूपती नावाची कंपनी शहरात बसून रिडींग ( reading takers and contractors Collusion ) टाकते. त्यामुळे बिलाचे आकडे वाढत आहेत या सर्व गोष्टीला महावितरणच्या अधिकाराचे पाठबळ आहे का...?.

वीज बिलाचे नवे संकट : बीड तालुक्यातील एक हजार लोकवस्तीच्या खंडाळा गावात महावितरणने वाढीव वीज बिलाचे नवे संकट नागरिकांसमोर उभे केले आहे. एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 100 ते दीडशे मीटर धारकांना पाचपट ते दहा पट वाढीव वीज बिल आल्याने लाईटही नको आणि बिलही नको अंधारात राहू असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. मोलमजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करतो. दहा आणि पंधरा हजार वीस बिल भरायचे कसे ? अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. विशेष म्हणजे रीडिंग घेण्यासाठी कुठलाही कर्मचारी येत नसल्याचे देखील गावकऱ्यांनी सांगितले.

34,000 पर्यंत वीज बिल : याच गावातील लोकांची मोलमजुरी करून कुटुंब चालवणाऱ्या छगन पवार यांना गेल्या चार वर्षापासून प्रत्येक महिन्याला पंचवीस हजार सत्तावीस हजार वीज बिल येत आहे. मुलं ऊस तोडीला जातात. दोघे म्हातारा म्हातारीच घरात आहोत. दोन बल्ब लावले त्या पलीकडे काहीच नाही तरी देखील 34,000 पर्यंत येत आहे. थकीत वीज बिल भरूनहीं एवढेच विज बिल येत आहे. अधिकाऱ्यांकडे जाऊन अर्ज विनंती केल्या तरी देखील काहीच होत नाही. शेवटी आत्महत्या करण्याची वेळ आली. असे छगन पवार यांनी सांगितले. वीज बिलाच्या धास्तीपाई मालक नीट जेवणही करत नाहीत असं चंद्रकला पवार पत्नीने सांगितले.

मीटर जळाले तरी पाच हजार बिल : शीला अप्पाराव पवार यांची परिस्थिती तर वेगळी आहे. सहा महिन्यापूर्वी मीटर जळालेला असताना देखील पाच हजार, सात हजार रुपये प्रत्येक महिन्याला वीज बिल येत आहे. मोलमजुरी करून बिलाचे पैसे भरायचे कसे, असा प्रश्न शीला पवार यांनी उपस्थित केला. शेळ्या सांभाळून आणि मोलमजूरी करून कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या दिव्यांग पिंटू पवार याला 1800 रुपये वीज बिल येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.