ETV Bharat / state

सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; विविध योजनांतील लाभार्थींना तीन महिन्यांचे एकत्रित मानधन - धनंजय मुंडे

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनांसंदर्भात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सामाजिक न्याय विभागाचा महत्वपूर्ण निर्णय; विविध योजनांसाठी १२५७ कोटी ५० लाख मंजूर
author img

By

Published : Apr 23, 2020, 8:20 PM IST

Updated : Apr 23, 2020, 8:36 PM IST

बीड - सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनांसंदर्भात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनांच्या राज्यातील जवळपास ३५ लाखाहून अधिक लाभार्थींना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे मानधन एकत्रित अ‌ॅडव्हान्स देण्यात येणार आहे. यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन अशा एकूण पाच योजनांचा समावेश आहे.

सामाजिक न्याय विभागाचा महत्वपूर्ण निर्णय; विविध योजनांसाठी १२५७ कोटी ५० लाख मंजूर

यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत तब्बल १२५७ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, वित्त व नियोजन विभागाने त्यास मान्यता दिली आहे. त्याबद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच वित्त मंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

संजय गांधी निराधार योजनेतून ११ लाख १५ हजार लाभार्थींना प्रतिमहिना १ हजार रुपये, श्रावणबाळ सेवा योजनेतून ११ लाख ७२ हजार लाभार्थींना प्रतिमहिना १ हजार रुपये मानधन राज्य शासनाच्या वतीने देण्यात येते. आता कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात एप्रिल, मे व जून य तीन महिन्यांचे मानधन एकत्रित देण्यात येणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजने अंतर्गत ६५ ते ७९ वयोगटातील दहा लाख ७३ हजार लाभार्थींना प्रतिमहिना एक हजार रुपये मानधन मिळते. यामध्ये ८० टक्के म्हणजेच प्रतिव्यक्ती आठशे रुपये इतका वाटा राज्य शासनाचा असतो. तर ८० व त्यावरील वयोगटाच्या ६८ हजार तीनशे लाभार्थींना प्रतिमहिना १ हजार रुपये मिळतात. यामध्ये ५०% म्हणजे पाचशे रुपये राज्य शासनाचा वाटा असतो.

तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या ७० हजार पाचशे लाभार्थींना प्रतिमहिना १ हजार ज्यामध्ये ७०% म्हणजे प्रति लाभार्थी ७०० रुपये राज्य सरकारचे आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना ज्यामध्ये राज्यात १० हजार तीनशे लाभार्थीं असून त्यांच्या प्रतिमहिना १ हजार रुपये मानधनांपैकी ७०% वाटा राज्य सरकार देते. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या एकूण परिस्थितीमुळे केंद्र सरकारने या तीनही योजनांमधील लाभार्थींना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे मानधन एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे मानधन एप्रिल महिन्यात देण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनाच्या दोन्ही योजनांच्या लाभार्थींनाही तीन महिन्याचे एकत्रित मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.

धनंजय मुंडे यांनी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली असून अर्थ मंत्रालयाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.दरम्यान, राज्यातील गोरगरीब वंचित तसेच वार्षिक उत्पन्न रुपये २१,००० पेक्षा कमी असलेले वृद्ध, निराधार, अंध, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या, देवदासी अशा उपेक्षितांची या काळात परवड होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या इतर विभागांच्या बरोबरीने सामाजिक न्याय विभाग भक्कमपणे नागरिकांच्या पाठीशी उभा असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमधून राज्यातील जवळपास ३५ लाख लाभार्थींना तीन महिन्यांचे एकत्रित मानधन देऊन त्यांच्या जीवनावश्यक वस्तू तथा आरोग्यविषयक सुविधांची पूर्तता होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. यासाठी १२५७ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात जिल्हानिहाय निधी वितरणाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार असून लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यांवर मानधन जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Last Updated : Apr 23, 2020, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.