बीड- सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच शुक्रवारी सायंकाळपासून बीड जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात २४ तासात सरासरी २२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सलग १२ तासापासून रिमझिम पाऊस सुरू होता. आज सकाळी १० पर्यंत हा पाऊस सुरू होता. जिल्ह्यातल्या दोन महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
हेही वाचा- ऑनलाईन कॅम्पेनद्वारे देणगी मिळवण्यात 'वंचित' सर्वात आघाडीवर
बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शेवटच्या टप्प्यात पाऊस पडल्यामुळे शेतकरी आनंदी आहे. बीड जिल्ह्यात सरासरी २२.२० मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील केज तालुक्यातील हरिनारायण पिंपरी येथे अतिवृष्टी म्हणजेच ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथे ८५ मिमी पाऊस झाला आहे. आज स्थितीत देखील बीड जिल्ह्यात चारा छावण्या सुरू आहेत. अनेक गावांना टँकरने पिण्याचे पाणी पुरवठा करावा लागत आहे.