ETV Bharat / state

#ग्राऊंड रिपोर्ट : हातचे काम जाण्याच्या भीतीने कामगारांचे पुन्हा पुणे-मुंबईकडे स्थलांतर..

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाखो मजूर मुंबई- पुण्यातून आपापल्या गावी रवाना झाले. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच गावाकडे परतलेल्या मजुरांनी पुन्हा शहराचा रस्ता धरलाय. नोकरी जाण्याच्या भीतीने कामगारांनी पुन्हा मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

labourer in beed
लॉकडाऊन शिथिल होताच गावाकडे परतलेल्या मजुरांनी पुन्हा शहराचा रस्ता धरलाय.
author img

By

Published : Jun 15, 2020, 8:03 PM IST

Updated : Jun 23, 2020, 3:53 PM IST

बीड - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाखो मजूर मुंबई- पुण्यातून आपापल्या गावी रवाना झाले. काहींनी सायकलवर तर काहींनी चालत प्रवास करून गाव गाठले. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच गावाकडे परतलेल्या मजुरांनी पुन्हा शहराचा रस्ता धरलाय. नोकरी गमावण्याची भीती त्यांच्या मनात घर करत आहे. नोकरी जाण्याच्या भीतीने कामगारांनी पुन्हा मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. जागर प्रतिष्ठानच्या सर्वेक्षणात संबंधित माहिती समोर आल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.

लॉकडाऊन शिथिल होताच गावाकडे परतलेल्या मजुरांनी पुन्हा शहराचा रस्ता धरलाय.

बीड हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. साडेसात ते आठ लाखांहून अधिक मजूर दरवर्षी ऊसतोडणीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत जातात. यात ऊसतोड कामगारांव्यतिरिक्त इतर मजूर देखील पुणे-मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये रोजंदारीवर काम करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर दोन ते अडीच लाखांहून अधिक मजूर गावी परतले होते. या काळात दोन-अडीच महिने गावात थांबल्यानंतर पुन्हा मजूरांवर उपाशी राहण्याची वेळ आली. यामुळे त्यांची शहरात जाण्यासाठी धडपड सुरू झाली. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात म्हणजेच अनलॉक-१.० मध्ये सरकारने नियमांमधील शिथिलता वाढवली. महानगरांतील छोट्या-मोठ्या कंपन्या सुरू झाल्या. मात्र मुंबई-पुण्यात राबणारे मजूर गावाकडे परतल्याने या ठिकाणी मजुरांची कमी भासू लागली. यानंतर कंत्राटदार मजुरांना जमेल त्या मार्गाने परत आणण्याची सोय करत आहेत.

पूर्वीची हात नोकरी जाऊ नये, म्हणून जीवाची परवा न करता गावागावातील मजूर पुन्हा मुंबई-पुण्याकडे स्थलांतरीत होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांनी सांगितले.

सव्वा लाखाहून अधिक मजूर परतले होते बीडमध्ये

संचारबंदी सुरू झाल्यानंतर ऊसतोड मजूर वगळता, महानगरांमध्ये छोटी-मोठी कामे करणारे सुमारे सव्वा लाखाहून अधिक मजूर बीड जिल्ह्यात परतले होते. यापैकी 40 टक्क्यांहून अधिक कामगार नोकरी जाण्याच्या भीतीने पुन्हा स्थलांतरीत होत आहेत. याबाबत अधिक माहिती जागर प्रतिष्ठानने दिली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून 78 हजार प्रवासी पास वितरीत

1 जूननंतर काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल झाले. त्यानंतर प्रशासनाकडून जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे पासेस मागणाऱ्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. सोमवारपर्यंत 73 हजार 865 पास प्रशासनाने वितरीत केले. या व्यतिरिक्त 1 लाख 8 हजार 300 पासेसमध्ये त्रुटी असल्याने रिजेक्ट करण्यात आले आहेत. एकंदरीत पास दिलेल्या नागरिकांची संख्या लक्षात घेता स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीड जिल्ह्यात एकूण 1 हजार चारशे चार च्या जवळपास गावांची संख्या आहेत. जागर प्रतिष्ठानचे काम जिल्हाभरात चालते संस्थेअंतर्गत जिल्ह्यातील मजुरांचा एक पाहणी आव्हाल घेण्यात आला यामध्ये लोक डाऊन काळात गावावर परतलेल्या मजुरांच्या मानसिकते संदर्भात माहिती घेण्यात आली त्यावेळी 45 ते 50 गावांमधील 40 टक्के पेक्षा अधिक प्रमाणात मजूर लॉकडाऊन शिथिल होताच पुणे-मुंबई ला रवाना झाले असल्याचे पुढे आले.

नोकरी गमावण्याच्या भीतीमुळेच स्थलांतर

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर 'गड्या आपला गाव बरा' म्हणत गावाकडे आलेल्या मजुरांना गावात कोणतेही काम नाहीय. तसेच मूलभूत सुविधा मिळण्यासाठी देखील झगडावे लागत असल्याचे समोर आले. ही वस्तुस्थिती जिल्ह्यात सर्वत्र आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर शहरातील कंपन्यांकडून मजुरांना फोन आल्याची माहिती मिळत आहे. कामावर न आल्यास दुसरे मजूर भरती करण्याचे सांगितल्याने भीतीपोटी हे कामगार पुन्हा शहरात परतत आहेत. बीड जिल्ह्यातून 40 टक्क्यांहून अधिक म्हणजेच 40 ते 45 हजार मजूर मुंबई-पुण्याकडे स्थलांतरित झाल्याची माहिती जागर प्रतिष्ठानच्या सर्वेक्षणात समोर आली आहे.

Last Updated : Jun 23, 2020, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.