ETV Bharat / state

Wife Killed Husband : ...म्हणून लग्नाच्या 22 व्या दिवशी नवववधूने केला नवरदेवाचा खून - killed husband

लग्नानंतर 22 व्या दिवशी एका तरुणाचा मृतदेह त्याच्या बेडरुममध्ये आढळून आला (22nd day after marriage Wife killed husband) होता. तर मयत राजाभाऊ याच्या गळ्याभोवती काही खुना दिसत असल्याने गळा दाबून त्याचा खुन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. अखेर तपासानंतर गेवराई पोलिसात पत्नी विरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला (Wife killed husband in Beed) आहे.

Wife Killed Husband
पत्नीने केला पतीचा खून
author img

By

Published : Nov 14, 2022, 9:01 AM IST

बीड : लग्नानंतर 22 व्या दिवशी एका तरुणाचा मृतदेह त्याच्या बेडरुममध्ये आढळून आला (22nd day after marriage Wife killed husband) होता. त्यावेळेस त्याच्या सोबत त्याची पत्नी होती. दरम्यान पत्नीनेच बेडरुमबाहेर येऊन नातेवाईकांना पती बेशुद्ध पडल्याचे सांगितले होते. त्यानंतर रुग्णालयात नेल्यानंतर सदरील तरुणाला डॉक्टरने मयत घोषीत केले. ही धक्कादायक घटना 7 नोव्हेंबर रोजी रात्री तालुक्यातील निपाणीजवळका येथे घडली होती. या प्रकरणी नातेवाईकांनी सुनानेच मुलाला मारल्याचा आरोप केला होता. अखेर तपासानंतर गेवराई पोलिसात पत्नी विरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला (Wife killed husband in Beed) आहे.

आवडत नसल्याने नववधूकडून नवरदेवाचा बीडमध्ये खून

नवरदेव आवडत नाही : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (वय 22, रा. निपाणीजवळका तांडा) याचे व शितल (रा. पौळाचीवाडी ता. जि. बीड) यांचे दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी पौळाचीवाडी येथे रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. त्यानंतर नवरदेव मुलगा राजाभाऊ मला आवडत नाही, असे म्हणून शितल त्याच्यासोबत सतत भांडण करत असे. दरम्यान दि. 7 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 11.00 ते 11.30 दरम्यान हे नवदाम्पत्य आपल्या बेडरुममध्ये झोपले असता रात्री 11.30 दरम्यान शीतल बेडरुम बाहेर येऊन सासू-सासर्‍याला म्हणू लागली की, पांडुरंग हे गार पडले आहेत. त्यानंतर नातेवाईकांनी राजाभाऊ याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत (after marriage Wife killed husband in Beed) केले.

खुन झाल्याचा संशय : तर मयत राजाभाऊ याच्या गळ्याभोवती काही खुणा दिसत असल्याने गळा दाबून त्याचा खुन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार सुनेनेच आमच्या मुलाला मारले आहे, असा संशय शितलच्या सासु-सासर्‍याने व्यक्त केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत 6 दिवसानंतर शितल विरोधात मयत पांडुरंग याची आई निलाबाई राजाभाऊ चव्हाण (वय 45) यांच्या फिर्यादीवरून कलम 302 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साबळे हे करत (Wife killed husband) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.