ETV Bharat / state

बीडमध्ये जुन्या वादातून भरदिवसा गोळीबार - गोळीबार न्यूज

जुन्या वादातून एका तरुणावर भरदिवसा गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणाचे दैव बलवत्तर आणि वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारात तरुणाचे प्राण वाचले आहेत.

गोळीबार
गोळीबार
author img

By

Published : Jul 17, 2021, 5:00 PM IST

बीड - जुन्या वादातून एका तरुणावर भरदिवसा गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणाचे दैव बलवत्तर आणि वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारात तरुणाचे प्राण वाचले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली असून हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

सतर्कता दाखविल्याने तरुणाचे वाचले प्राण

याप्रकरणी दोघांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर व येथेच बांधकाम साहित्याचे दुकान आहे. दरम्यान, शुक्रवार दि. 16 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या दुकानासमोर पवन गावडे हे थांबले असता याठिकाणी दोन तरुण मोटारसायकलवरुन आले. यानंतर जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे म्हणून गावडे यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या डोक्याला एका जणांनी पिस्तल लावून गोळी झाडली. यावेळी गावडे यांनी सतर्कता दाखविल्याने गोळी डोक्याला चाटून गेली. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार व अविनाश पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे हे करत आहेत.

हेही वाचा - PowerGame? : शरद पवारांनी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट, तासभर खलबतं; तर्क-वितर्कांना उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.