ETV Bharat / state

धक्कादायक! मुख्याध्यापक पित्याचा पोटच्या तीन मुलींवर अत्याचार, केज पोलिसात गुन्हा दाखल

मुख्याध्यापक असलेल्या पित्याने पोटच्या तीन मुलींवर अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीने याविषयी आवाज उठवण्याचा प्रयत्न केले असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीने तिच्या मैत्रिणीच्या मावशीच्या मोबाईलवर मेसेज टाकून झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

नराधम पित्याचा पोटच्या तीन मुलींवर अत्याचार

author img

By

Published : Apr 3, 2020, 8:52 AM IST

Updated : Apr 3, 2020, 10:47 AM IST

बीड - मुख्याध्यापक असलेल्या पित्याने पोटच्या तीन मुलींवर अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीने याविषयी आवाज उठवण्याचा प्रयत्न केले असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीने तिच्या मैत्रिणीच्या मावशीच्या मोबाईलवर मेसेज टाकून झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्याने त्यांनी त्यांच्या सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या कोल्हापूर येथील मित्रास ही माहिती दिली. कोल्हापूरच्या त्या संबंधित व्यक्तीने केज पोलिसांना याबाबत माहिती देताच पोलिसांनी तत्काळ घटनासस्थळी जाऊन पीडित मुलींची सुटका केली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पित्यासह आई, भाऊ, चुलता व चुलत भावाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील एका राजकीय नेत्याच्या संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापकपदी विराजमान असलेल्या नराधम पित्याने पिडीतेवर ती इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना सन २०१२ मध्ये बळजबरी करून अत्याचार केला. याची माहिती पीडित मुलीने दुसऱ्या दिवशी तिच्या आईला दिली असता तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर या नराधमाने पीडितेला मारहाण करण्याची धमकी देत आणखी अत्याचार केले.

तर, इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दुसऱ्या मुलीवरही या नराधमाने अत्याचार केला. या बाबतची माहिती दुसऱ्या पीडित मुलीने तिच्या आईस दिली असता तिलाही बेदम मारून याची कुठेही वाच्यता केली तर दररोज बेदम मारहाण करण्याची धमकी दिली. या घटनेने दोन्ही पीडित मुली मारहाण आणि व अब्रूच्या भीतीपोटी गप्प बसून अत्याचार सहन करत होत्या. दरम्यान सन २०१८ मध्ये पीडित दोन मुलींची बहीण आई वडिलांसह अंबाजोगाई येथे वास्तव्यास असताना तिसऱ्या अल्पवयीन मुलीच्या बेडवर झोपण्याचा प्रयत्न या नराधम पित्याने केला होता.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या साथीमुळे बाहेरगावी शिक्षण घेत असलेल्या दोन्ही पीडित मुली दिनांक १८ व २२ मार्च रोजी गावी परत आल्या होत्या. तर, लहान बहीण घरीच होती. दिनांक ३१ मार्चच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास परत त्याने मोठ्या मुलीची छेड काढली. या प्रकारास कंटाळलेल्या मुलीने त्याला विरोध करताच पिडीतेला मारहाण करण्यात आली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने याची माहिती तिच्या मैत्रिणीच्या मावशीला संपर्क साधून दिली व त्यानी याची माहिती सामाजिक काम करत असलेल्या मित्रास दिली. सामाजिक कार्यकर्ताने याबाबत केजचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना कळवले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पीडित मुलीच्या गावी जाऊन घरातून त्यांची सुटका केली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात नराधम पित्यासह त्याला मदत करणारी पीडित मुलीची आई, भाऊ , चुलता व चुलतभावा विरुद्ध केज पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीने केलेल्या धाडसाने हा धक्कादायक प्रकार उघड झाला. पीडित मुलींना विष घालून मारणार असल्याची माहिती मिळाल्याने तिने याची माहिती मैत्रिणीच्या मावशीच्या मोबाईलवर संपर्क साधून दिली. मावशीने सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या मित्रास व त्यांनी पोलीस निरीक्षक याना दिल्याने ही घटना उघडकीस आली.

Last Updated : Apr 3, 2020, 10:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.