ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट; 'त्या' मुलाची मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली दखल - etv bharat impact news beed

आष्टी तालुक्यातील वाळके वस्तीवरील मंगेश वाळके या वडिलांचे छत्र हरवलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबाची व्यथा शिक्षकांनी सांगितलेल्या निबंधातून मांडली होती. यासंदर्भातील वृत्त 'ईटीव्ही भारत' ने प्रसारित केले होते.

ETV bharat impacts beed dhananjay munde will give attention to that boy
'त्या' मुलाची मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली दखल
author img

By

Published : Jan 19, 2020, 6:54 PM IST

Updated : Jan 19, 2020, 10:47 PM IST

बीड - आष्टी तालुक्यातील वाळके वस्तीवरील मंगेश वाळके या वडिलांचे छत्र हरवलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबाची व्यथा शिक्षकांनी सांगितलेल्या निबंधातून मांडली होती. यासंदर्भातील वृत्त 'ईटीव्ही भारत' ने प्रसारित केले होते. याची दखल पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्या संघर्षपुत्र मंगेशला मदत करण्यात येणार असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे.

'ईटीव्ही भारत'चा इम्पॅक्ट; 'त्या' मुलाची मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली दखल

'माझे पप्पा काही दिवसांपूर्वी टीबीच्या आजाराने वारले. मी पाण्यात बुडत असलेली गाय कशीबशी बाहेर काढली. आम्हाला कोणीही मदत करत नाही. मला आणि आईला चोरांची भीती वाटते. पप्पा मला तुमची खूप आठवण येते', अशा अत्यंत भावनिक शब्दात मंगेशने आपल्या व्यथा शाळेतील निबंधाच्या वहीत मांडल्या होत्या. मंगेशच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्याच्या आई शारदा वाळके ह्या दिव्यांग आहेत. परिवारात कोणीही कमावते नसल्याने माय-लेकरांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मंगेशच्या दाटलेल्या भावना पाहून त्याच्या शिक्षिकेने तो निबंध इतरांना पाठवून मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर हा निबंध सोशल मीडियावर व्हायरल झाला. गेल्या दोन दिवसात विविध माध्यमांत याची जोरदार चर्चा सुरू होती.

हेही वाचा - 'राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक नव्या पिढीली आधुनिकतेचा आणि समतेचा विचार देईल'

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ समाजकल्याण विभागामार्फत 'दिव्यांग बीज भांडवल योजनें'तर्गत 1.5 लक्ष रुपये स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य, जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष 5 टक्के, बस पास, यु. डी. आय.डी. कार्ड, तसेच दिव्यांग महामंडळामार्फत रोजगारासाठी अर्थसहाय्य आदी योजना लागू करावी. तसेच वाळके परिवारास भरीव आर्थिक मदत करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मंगेश आणि त्याच्या परिवाराला सहाय्य मिळेल हे आता निश्चित झाले आहे.

Intro:'ईटीव्ही भारत' च्या वृत्ताची दखल; 'त्या' मुलाची मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली दखल

बीड - जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळके वस्तीवरील मंगेश वाळके या वडिलांचे छत्र हरवलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबाची व्यथा शिक्षकांनी सांगितलेल्या निबंधातून मांडली होती. याचे वृत्त 'ईटीव्ही भारत' ने प्रसारित केले होते याची दखल बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली असून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्या संघर्षपुत्र मंगेश ला मदत करण्यात येणार असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे.

'माझे पप्पा काही दिवसांपूर्वी टीबी च्या आजाराने वारले, मी पाण्यात बुडत असलेली गाय कशीबशी बाहेर काढली, आम्हाला कोणीही मदत करत नाही, मला व आईला चोरांची भीती वाटते, पप्पा मला तुमची खूप आठवण येते अशा अत्यंत भावनिक शब्दात मंगेशने आपल्या व्यथा शाळेतील निबंधाच्या वहीत मांडल्या होत्या. मंगेशच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेला आहे त्याच्या आई शारदा वाळके ह्या दिव्यांग आहेत. परिवारात कोणीही कमावते नसल्याने माय-लेकरांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मंगेशच्या दाटलेल्या भावना पाहून त्याच्या शिक्षिकेने तो निबंध इतराना पाठवून मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर हा निबंध सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गेल्या दोन दिवसात विविध माध्यमात याची जोरदार चर्चा सुरू होती.

दरम्यान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ समाज कल्याण विभागामार्फत 'दिव्यांग बीज भांडवल योजना अंतर्गत 1.5 लक्ष रुपये स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय, जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष ५%, बस पास, यु. डी. आय.डी. कार्ड, तसेच दिव्यांग महामंडळामार्फत रोजगारासाठी अर्थसहाय्य आदि योजना लागू करून वाळके परिवारास भरीव आर्थिक मदत करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मंगेश व त्याच्या परिवाराला सहाय्य मिळेल हे आता निश्चित झाले असून ना. धनंजय मुंडे यांची सामाजिक संवेदनशीलता या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आली आहे.Body:बConclusion:ब
Last Updated : Jan 19, 2020, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.