बीड LIVE
2.41 PM : गेवराई - भाजपचे लक्ष्मण पवार 6691 मतांनी विजयी.
1. 44 PM : बीड - पंधराव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर केवळ 7542 मतांनी आघाडीवर.
1.30 PM : परळी - राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 30768 मतांनी विजयी. पंकजा मुंडे 90418 मते मिळवून पराभूत.
12.46 PM : आष्टी - अठराव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे 21464 मतांनी आघाडीवर
12.46 PM : परळी - सतराव्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 28116 मतांनी आघाडीवर
12.17 PM : माजलगाव - दहाव्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके 12049 मतांनी आघाडीवर.
11.05 AM : परळी - चौदाव्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 26000 मतांनी आघाडीवर
11.49 AM : बीड - आठव्या फेरीअखेर जयदत्त क्षीरसागर केवळ 773 मतांनी आघाडीवर.
11.05 AM : परळी - अकराव्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 18206 मतांनी आघाडीवर
11.02 AM : बीड - सहाव्या फेरीअखेर जयदत्त क्षीरसागर केवळ 98 मतांनी आघाडीवर.
10.19 AM : बीड - क्षीरसागर काका पुतण्यामध्ये अटीतटीची लढत. चौथ्या फेरीअखेर जयदत्त क्षीरसागर केवळ 58 मतांनी आघाडीवर.
10.14 AM : परळी - सातव्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 6870 मतांनी आघाडीवर
10.09 AM : माजलगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके 4057 मतांनी आघाडीवर.
9.50 AM : बीड - पहिल्या फेरीत शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर 1009 मतांनी आघाडीवर.
9.39 AM : परळी - चौथ्या फेरीअखेर पंकजा मुंडे 3541 मतांनी पिछाडीवर. गोपाीनाथ गड भागात पंकजा 800 मतांनी पिछाडीवर.
9.13 AM : परळी - तिसऱ्या फेरीअखेर धनंजय मुंडे 3500 मतांनी आघाडीवर.
9.08 AM : परळी - पंकजा मुंडेंच्या नाथरा गावात पंकजा मुंडे यांना 1600 पैकी केवळ 315 मते.
9.08 AM : परळी - दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 1600मतांनी आघाडीवर.
8.50 AM : बीड - पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर 339 मतांनी आघाडीवर.
8.43 AM : परळी - पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 500 मतांनी आघाडीवर. धनंजय मुंडे मतमोजणी केंद्रावर दाखल.
राज्यातील हायप्रोफाईल लढतीचा जिल्हा, अशी बीड जिल्ह्याची ओळख आहे. बीड जिल्ह्यात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. गेल्या निवडणुकांमध्ये बीड विधानसभा मतदारसंघ वगळता इतर सर्व जागा भाजपने आपल्या खिशात घतल्या होत्या. यंदा विधानसभा निवडणुकीचे चित्र अतिशय रंगतदार आहे. यावेळी भाजप-शिवसेना महायुती आणि राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत पाहायला मिळणार आहे. असे असले तरी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएच्या उमेदवारांनी देखील यात रंगत आणली आहे. ही निवडणूक प्रमुख पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. दरम्यान मतदर कुणाला कौल देणार हे आता थोड्याच वेळात कळणार आहे.