ETV Bharat / state

'....मात्र, गोपीनाथ मुंडेंनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही' - एकनाथ खडसे भाषण लेटेस्ट भाषण गोपीनाथगड बीड

पुढे बोलताना ते म्हणाले, पक्षाविरोधात बोलू नका, असा पक्षाच्या श्रेष्ठींचा आदेश आहे. मात्र, पक्षाची ही भूमिका मान्य नाही. वरून गोड बोलायचे आणि दुसऱ्याला मदत करून पाडायचे ही खंत आहे. हे आम्हाला नाही. गोपीनाथरावांची मुलगी पाडली याचे दु:ख आहे. तसेच पंकजा यांना पराभव घडला नाही तर, घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

eknath khadse
एकनाथ खडसे
author img

By

Published : Dec 12, 2019, 2:58 PM IST

Updated : Dec 12, 2019, 3:16 PM IST

बीड - भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीमध्ये कार्य करणाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले नाही तर उलट त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना घडवले, असे वक्तव्य भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी येथे केले. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज (१२ डिसेंबर) जयंती आहे. यानिमित्ताने त्यांच्या कन्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन केले. त्यावेळी खडसेंनी गेल्या 5 वर्षात त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाट मोकळी करून दिली.

खडसे पुढे म्हणाले, महादेव जानकरांनी मान्य केले की भाजपने आम्हाला छळले आहे. मात्र, तरीदेखील महादेवराव मुंडे साहेबांच्या प्रेमापोटी भाजपसोबत आहेत, हे एक उदाहरण आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, आणीबाणीच्या कालखंडात तुरुंगात होते तेव्हापासूनचा कालखंड मी पाहिला आहे. जनसंघापासूनची भाजपची वाटचाल मी पाहिली आहे. सुरूवातीला शेठजी-भटजींचा पक्ष असे हिणवले जाणाऱ्या भाजपला बहुजनांचा पक्ष कऱण्याचे काम गोपीनाथ रावांनी केले. तर त्यांच्या भाषणादरम्यान नवीन पक्ष काढा नवीन, अशी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्या.

हेही वाचा - अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीत होणार अधिकृत प्रवेश

तसेच व्यासपीठावर बसलेले आज भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीमध्ये जेवढे कार्य केले. त्या सर्व कार्यकर्त्यांना मुंडेंनी घडवले आहे. मुंडे साहेबांसोबतच्या आठवणींनी मन व्याकूळ होते. १ जूनला आम्ही सोबत जेवण केले आणि ३ तारखेला परळीला येणारा माणूस परत आला नाही, याचे दु:ख असल्याचे ते म्हणाले. मुंडेंनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. 'हम तो डुबेंग सनम पर तुम को भी लेकर डुबेंगे,' असे सांगत ते यावेळी भावनिक झाले. जिथे एकनाथ तिथे गोपीनाथ अशी परिस्थिती होती. मात्र, तो खंबीर आधार माझ्या पाठिशी राहिला नाही याची राहून राहून खंत वाटते. पुढे बोलताना ते म्हणाले, पक्षाविरोधात बोलू नका, असा पक्षाच्या श्रेष्ठींचा आदेश आहे. मात्र, पक्षाची ही भूमिका मान्य नाही. वरून गोड बोलायचे आणि दुसऱ्याला मदत करून पाडायचे ही खंत आहे. हे आम्हाला मान्य नाही. गोपीनाथ रावांची मुलगी पाडली याचे दु:ख आहे. तसेच पकंजा यांना पराभव घडला नाही तर घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

खडसे म्हणाले, माझ्यावर आणि गोपीनाथावर आरोप केले आणि आमचे राजकारण उद्धध्वस्त केले. मात्र, मुंडेंनी पक्षासाठी आयुष्य खर्ची घातले म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात, मग आम्हाला पाडण्याचे षडयंत्र का रचले? आम्ही हे किती दिवस सहन करावे. मी अजून पक्ष सोडलेला नाही. मात्र, माझा भरोसा धरू नका, असा सूचक इशाराही खडसेंनी यावेळी दिला. तुम्ही आम्ही पक्ष सोडून जावे यासाठी जी वागणूक देत आहात हे बरोबर नाही. आधी गोड बोलायचे, नंतर छळ करायचा ही नीती बरोबर नाही. तसेच गोपीनाथ मुंडे असते तर खडसे मुख्यमंत्री झाले असे म्हणायचे हे गोड बोलणे योग्य नाही, असेही खडसे म्हणाले. देवेंद्रला अध्यक्ष करण्यासाठी मुंडेंसाहेबांनी सांगितले म्हणून मी संमती दिली. मात्र, ज्यांनी मोठे केले त्यांच्याशी असे वागणे बरोबर नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - मेळाव्याआधी चंद्रकांत पाटलांची पंकजा मुंडेंबरोबर चर्चा

मी फडणवीसांचे आभार मानतो, कारण त्यांनी दुसऱ्यांदा २३ तारखेला शपथ घेतली आणि २४ तारखेला मुंडे साहेंबांच्या स्मारकाला मी जी ५ वर्षापूर्वी जागा दिली होती त्या जागेवर ५ वर्षांनंतर त्यांनी मंजूरी दिली. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे त्यांचे किती उपकार आहेत, असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तत्काळ त्या स्मारकासाठी त्यांनी निधी दिला. शिवाय उद्धव ठाकरे स्वत: औरंगाबादच्या ठिकाणी जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जास्त उघड करून टाकले तर शिस्तभंगाची कारवाई होईल, आधीच तिकीट कापले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, माझा काय गुन्हा आहे हे तरी सांगा? मी चोरी केली, डाका टाकला का कोणत्या महिलेसोबत...? मग कारण तर काय ते सांगा. पक्ष जर मला माझी चूक काय हे सांगत नसेल जीव गुदमरणार नाही का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच माझ्या बाबतीत झाले ते पंकजाताईंच्या बाबतीत होऊ नये. आम्ही सगळे तिच्यासोबत आहोत. ती वाघाची पोरगी आहे. ती वाघीण आहे. आणि आम्ही कायम तिच्या सोबत राहू असेही खडसे यांनी यावेळी सांगितले. तर माझ्याकडे बोलण्यासारखे खूप आहे. मात्र, याठिकाणी बोलायला वेळ नसल्याचे खडसे म्हणाले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Dec 12, 2019, 3:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.