ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांची चारा छावण्यांना भेट, नियम डावलणाऱ्यांवर झाली कारवाई

एकूण दहा पैकी काही छावण्यांमध्ये ३० ते ४० जनावरे प्रत्यक्षात कमी असल्याचे आढळून आले. अशा चारा छावण्यांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.

author img

By

Published : May 5, 2019, 7:51 AM IST

चारा छावणीवर जिल्हाधिकारी पांडेय

बीड - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांना शनिवारी दुपारी अचानक भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांनी पशु मालकांची विचारपूस केली. बीड जिल्ह्यातील खोकरमोहा, रायमोहा, आव्हाळवाडी, शिरूर, तांबा राजुरी, पाटोदा येथील छावण्यांना जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिली.

बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे चारा छावण्या सुरू केल्या आहेत. छावणीवर दाखल झालेल्या जनावरांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा मिळतात का ? याची तपासणी जिल्हाधिकारी पांडेय यांनी शनिवारी केली. जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी छावणी चालकाने घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना छावणी चालकांना दिल्या.

जनावरांना द्यायचा चारा, गोळी पेंड, खाद्य हे नियमित देण्याबाबत वेळापत्रक बनवण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी छावणीवरील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे समस्या मांडल्या. तपासणी केलेल्या एकूण दहा पैकी काही छावण्यांमध्ये ३० ते ४० जनावरे प्रत्यक्षात कमी असल्याचे आढळून आले. अशा चारा छावण्यांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.

याप्रसंगी नायब तहसीलदार यांच्यासह जिल्हा प्रशासनातील पदाधिकारी उपस्थित होते. केलेल्या तपासणीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

Intro:खालील बातमीतील जिल्हाधिकारी यांचे छावणी भेटीचे व्हिडिओ मेलवर सेंड करत आहे
*********
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी चारा छावणीला दिली अचानक भेट

बीड- जिल्ह्यातील चारा छावण्यांना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शनिवारी दुपारी अचानक भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी यांनी यावेळी पशु मालक यांच्याशी चर्चा करत चारा वेळेवर मिळतो का? याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. बीड जिल्ह्यातील खोकरमोहा, रायमोहा, आव्हाळवाडी, शिरूर, तांबा राजुरी, पाटोदा येथील छावण्यांना जिल्हाधिकारी यांनी भेट दिली.

Body:बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे काळा सावळा सुरू केलेल्या आहेत. छावणीवर दाखल झालेल्या जनावरांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा मिळतात का? याची तपासणी जिल्हाधिकारी पांडे यांनी शनिवारी केली. यामध्ये चारा, खाद्य यासह जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी छावणी चालकाने घेणे आवश्यक आहे. या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना छावणी चालकांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जनावरांना द्यायचा चारा, गोळी पेंड, खाद्य हे नियमित देण्याबाबत वेळापत्रक बनवण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी छावणी वरील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे समस्या मांडल्या तपासणी केलेल्या एकूण दहा पैकी काही छावण्यांमध्ये 30 ते 40 जनावरे प्रत्यक्षात कमी असल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे सदर चारा छावण्या वर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.

Conclusion:याप्रसंगी नायब तहसीलदार यांच्यासह जिल्हा प्रशासनातील पदाधिकारी उपस्थित होते. केलेल्या तपासणीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.