आष्टी (बीड) - कोरोनाच्या संसर्गाचे गांभिर्य लक्षात घेत, खबरदारी म्हणून आपण आपले घर, परिसर स्वच्छ ठेण्याची गरज आहे. रस्त्यावर कचरा न टाकता दररोजचा कचरा एकञ करत सकाळी तो घंटागाडीतच टाकावा, यासाठी मनसेच्या वतीने शहरातील दोनशे कुटुंबीयांना कचराकुंड्यांचे (डजबीन) वाटप करण्यात आले. आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी केले आहे. मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मेटे, शहरध्यक्ष महेश अनारसे, केशव डोमकावळे, संपत सायकड, सदाशिव बन, दत्ता होनराव यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, दरवर्षी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गरजुंना मोफत बियाणे, खत यांचे वाटप करत असतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून राज्यावर कोरोनाचे सावट आहे. कोरोना काळात परिसर स्वच्छ राहिला पाहिजे या हेतुने आम्ही नागरिकांना कचरा कुंड्यांचे वाटप केले आहे. तसेच आपल्या घरासह परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करत आहोत.
रांगोळीतून साकारले राज ठाकरेंचे चिञ
आष्टी शहरातील आरती नवनाथ ससाणे या तरुणीने राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज ठाकरे यांचे चित्र रांगोळीत साकारले आहे. ही रांगोळी पाहाण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
हेही वाचा - राम मंदिर ट्रस्टच्या जमीन घोटाळ्यासंबंधी सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावे - संजय राऊत