ETV Bharat / state

Dhananjay Munde Death Threat: छगन भुजबळांनंतर राज्याचे नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकीचा फोन, 50 लाख रूपयांची मागणी

author img

By

Published : Jul 11, 2023, 1:59 PM IST

Updated : Jul 11, 2023, 2:18 PM IST

सध्या राजकीय नेत्यांना धमकीचे फोन येण्याचे सत्र आहे. सोमवारी छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आला होता. आता त्यानंतर धनंजय मुंडे यांना देखील धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे.

Dhananjay Munde Death Threat
धनंजय मुंडे

मुंडे धमकी प्रकरणावर पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

बीड : छगन भुजबळांनंतर मंत्री धनंजय मुडे यांनाही धमकीचा फोन आला आहे. फडणवीस शिंदे आणि पवार सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांना रात्री बारा वाजता एका व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे मला पन्नास लाख रुपये द्या, नाहीतर धनंजय मुंडे यांना जीवे मारेन, अशी धमकी त्यांच्या परळीतील पंढरी निवासस्थानी असलेल्या लँडलाईन फोनवर त्या व्यक्तीने दिली. या व्यक्तीच्या विरोधामध्ये परळीत वाल्मीक कराड यांनी तक्रार दिली आहे. त्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या फोनमुळे धनंजय मुंडे समर्थकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

लँडलाईनवर फोन करून 50 लाखाची मागणी : राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे छगन भुजबळ यांना एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्या व्यक्तीला पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. मात्र, रात्री बारा वाजता धनंजय मुंडे यांना त्यांच्या पंढरी निवासस्थानी लँडलाईनवर फोन करून 50 लाखासाठी धमकी दिल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे बीडमध्ये येण्याअगोदरच त्यांना धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याविषयी वाल्मिक कराड यांनी परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये याविषयी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

राजकीय नेत्यांना धमकीचे फोन : छगन भुजबळ यांनाही धमकीचा फोन आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली. या फोननंतर छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली होती. सोमवारी रात्री दहा ते साडे दहाच्या वाजेदरम्यान धमकीचा कॉल आला होता. आरोपीने त्याला छगन भुजबळ यांना मारण्याची सुपारी मिळाली असल्याचे सांगितले होते. पोलीसांनी या प्रकरणी आरोपीने नशेत हे कृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार, संजय राऊत या राजकीय नेत्यांना देखील धमकीचे फोन आले होते.

हेही वाचा :

  1. Chhagan Bhujbal Death Threat: धमकी प्रकरणावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले शरद पवार...
  2. Chhagan Bhujbal Death Threat: छगन भुजबळांची सुपारी मिळाल्याने जीवे मारणार.. अटकेनंतर आरोपीने धमकीचे सांगितले कारण
  3. Sharad Pawar Death Threat: शरद पवार यांना धमकी देणाऱ्या सागर बर्वेला पुराव्या अभावी जामीन मंजूर

Last Updated : Jul 11, 2023, 2:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.