बीड - दिवाळी सुट्ट्यांसाठी मामाच्या गावी आलेल्या एका 1 वर्षीय मुलाचा व त्याचा मामेभाऊ या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील लिंबोटी येथे आज (शनिवारी) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - नुकसानीचे पंचनामे करण्यात मराठवाड्यात बीड जिल्हा अव्वल, ८९७ गावांचे पंचनामे पूर्ण
संकेत आघाव (8) व महेश आंधळे (9) अशी मृत मुलांची नावे आहेत. ते नात्याने आते-मामे भाऊ होते. आष्टी तालुक्यातील खिळद येथील संकेत बापु आघाव (रा. खिळद ता आष्टी) हा आईसोबत भाऊबीज निमित्त मामाच्या गावी लिंबोटी येथे आला होता. रविवारी सायंकाळी संकेत त्याच्या मामाचा मुलगा महेश सतिश आंधळे सोबत शेतात गेला. शेतालगत असलेल्या लिंबोडी तलावाजवळून जात असताना दोघेही तोल जाऊन पडले. यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला.
हेही वाचा - विजेचा धक्का लागून मावशीसह भाचीचा जागीच मृत्यू; शिंदी गावावर शोककळा
घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.