बीड : राज ठाकरे यांना तारखेला हजर न राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश परळी न्यायालयाने दिला आहे. राज ठाकरेंना मुंबई येथे अटक केल्यामुळे परळी येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पाईंन्टवर परळी येथे बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक करत बसची काच फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणात राज ठाकरेंनी चिथावणी दिल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीसांनी तपास करुन राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रकरण जुने असून राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांनी जामीन घेतला व न्यायालयात सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी वैजनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिला आहे. गंगाखेड डेपो च्या चालकाने 22 -10- 2008 ला परळी ग्रामीण ठण्यात तक्रार दाखल केली होती.
राज ठाकरेंच्या गैरहजेरीमुळे आरोपीविरुद्ध न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असल्यामुळे राज ठाकरे विरुद्ध पकड वॉरंट काढण्यात आले आहे. ४ फेब्रुवारी २००९ ला दोषारोप पत्र दाखल करण्यात आले तेव्हा पासून आज पर्यंत तब्बल ८३ वेळा तारखा देण्यात आल्या मात्र ते गैरहजर राहिल्याने हे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. दरम्यानच्या काळात राज ठाकरे यांनी न्यायालयाच्या हजेरी पासून सूट मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, परळी न्यायालयाने तो तेव्हाच फेटाळला त्यामुळे राज ठाकरें विरोधात अटक वारंट काढण्यात आले आहे.
सार्वजनिक मालमत्ता नुकसान केल्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरे, संजय उत्तम आघा, अनिस सुजात बेग, शिवदास कचरूबा बिडगर, प्रल्हाद राधाकिशन सुरवसे आणि राम ज्ञानोबा लटपटे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी १० फेब्रुवारी परळी न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते आणि १३ एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर राण्याससंदर्भात सांगितले होते. मात्र, राज ठाकरे हे १३ एप्रिलपर्यंत कोर्टात हजर न झाल्याने पुन्हा दुसऱ्यांदा परळी कोर्टाने राज ठाकरे यांना अटक वॉरंट काढले आहे.
हेही वाचा : Raj Thackeray : राज ठाकरेंना दिलासा.. उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय..