ETV Bharat / state

गोपीनाथ मुंडे बहुजनांचे होते तर, पंकजा मुंडे महाजनांच्या आहेत - बाबुराव पोटभरे - baburao potbhare

लोकनेते गोपीनाथ मुंडे हे एक व्यक्ती नसून विचार आहे. तो विचार पुढे घेऊन जाण्याचे खरे काम या जिल्ह्यातील दलितांनी व अठरापगड जातींनी केले आहे.

बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे
author img

By

Published : Apr 8, 2019, 5:04 PM IST

बीड - भाजप सरकारच्या काळात राज्यात व केंद्रात बहुजनांवर अन्याय झाला आहे. दलित, धनगर, साळी, माळी, कोळी व मुस्लीम हे कोणीच भाजपच्या राज्यात सुरक्षित नाहीत. गोपीनाथ मुंडे यांच्या काळात बहुजन वर्गातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका असायची मात्र आता परिस्थिती बदलली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे बहुजनांचे होते तर पंकजा मुंडे या महाजनांच्या आहेत, अशी सणसणीत टीका बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी सोमवारी केली.

बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे

बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बाबुराव पोटभरे पत्रकारांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले, की भाजपच्या धोरणाचा मोठा फटका जिल्ह्यातील जनतेला बसलेला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे हे एक व्यक्ती नसून विचार आहे. तो विचार पुढे घेऊन जाण्याचे खरे काम या जिल्ह्यातील दलितांनी व अठरापगड जातींनी केले आहे. मात्र, स्वतःला वारसा म्हणून घेणाऱ्या पंकजा मुंडे याच दलित विरोधी आहेत. मागच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात दलितांना कसलीच संधी पंकजा मुंडेच्या पुढाकाराने मिळालेली नाही. ज्या गोपीनाथ मुंडेंचा वारसा पंकजा मुंडे सांगतात त्यांचे विचार देखील पंकजा मुंडे यांनी जपलेले नाहीत. सत्ता असताना कायम बहुजनांच्या विरोधातील निर्णय घेतले. या पुढे जिल्ह्यातील जनता बहुजनांचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना मानेल मात्र महाजनांच्या पंकजा मुंडे यांना स्वीकारणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, असे मत बाबुराव पोटभरे यांनी यावेळी व्यक्त केले.

दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे हे गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर होते. यामुळे बाबुराव पोटभरे यांनी केलेले आरोप गांभीर्याने घेयाचे का ही चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Intro:गोपीनाथ मुंडे बहुजनांचे होते तर पंकजा मुंडे महाजनांच्या आहेत; बीडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का

बीड- भाजप सरकारच्या काळात राज्यात व केंद्रात बहुजनांवर अन्याय झाला आहे. दलित, धनगर, साळी, माळी, कोळी व मुस्लीम हे कोणीच भाजप च्या राज्यात सुरक्षित नाहीत. गोपीनाथ मुंडे यांच्या काळात बहुजन वर्गातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका असायची मात्र आता परिस्थिती बदलली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे बहुजनांचे होते तर पंकजा मुंडे या महाजनांच्या आहेत. अशी सणसणीत टीका बहुजन विकास मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी सोमवारी केली.

Body:बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बाबुराव पोटभरे पत्रकारांशी बोलत होते पुढे ते म्हणाले की, भाजपच्या धोरणाचा मोठा फटका बीड जिल्ह्यातील जनतेला बसलेला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे हे एक व्यक्ती नसून विचार आहे. तो विचार पुढे घेऊन जाण्याच खरं काम या बीड जिल्ह्यातल्या दलितांनी व अठरापगड जातींनी केले आहे. मात्र स्वतःला वारसा म्हणून घेणाऱ्या पंकजा मुंडे याच दलित विरोधी आहेत. मागच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात दलितांना कसलीच संधी पंकजा मुंडे च्या पुढाकाराने मिळालेली नाही. ज्या गोपीनाथ मुंडेंचा वारसा पंकजा मुंडे सांगतात त्यांचे विचार देखील पंकजा मुंडे यांनी जपलेले नाहीत. सत्ता असताना कायम बहुजनांच्या विरोधातील निर्णय घेतले या पुढे बीड जिल्ह्यातील जनता बहुजनांचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना मानेल मात्र महाजनांच्या पंकजा मुंडे यांना स्वीकारणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. असे मत बाबुराव पोटभरे यांनी यावेळी व्यक्त केले.

Conclusion:14 च्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे हे गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर होते. यामुळे बाबुराव पोटभरे यांनी केलेले आरोप गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.