ETV Bharat / state

75 मिमी पाऊस असेल तरच पेरणी करा, कृषी विभागाचा सल्ला - beed

कृषी विभागाच्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात ४५ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. परंतु अद्यापही बहुतांश भागात पाऊस झालेला नसल्याचे चित्र पाहायला मिळते. जिल्ह्यातील काही महसूल मंडळात पाऊस ११० ते १२० मिलिमीटर एवढा पडला आहे.

पंचाहत्तर मिमी पाऊस असेल तरच पेरणी करा, कृषी विभागाचा सल्ला
author img

By

Published : Jul 8, 2019, 8:14 PM IST

बीड - जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये एकूण ५१.० मिमी पाऊस झाला आहे. ज्या तालुक्यात अथवा महसूल मंडळात ७५ मिमी. पेक्षा जास्त पाऊस पडला असेल त्याच शेतकऱ्यांनी पेरणी करावी अन्यथा पावसाची वाट पहावी. पिकासाठी आवश्यक पाऊस हा ७५ मिलिमीटरपेक्षा जास्त आवश्यक आहे. याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन बीड जिल्हा कृषी विभाग यांच्यावतीने तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे. बीड जिल्ह्यात काही भागात समाधानकारक आहे. तर, काही ठिकाणी पेरणीला अजून सुरुवातच नाही. सोमवारपर्यंत जिल्ह्यात ४५ टक्के पेरणी झाली असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

कृषी विभागाच्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात ४५ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. परंतु अद्यापही बहुतांश भागात पाऊस झालेला नसल्याचे चित्र पाहायला मिळते. जिल्ह्यातील काही महसूल मंडळात पाऊस ११० ते १२० मिलिमीटर एवढा पडला आहे. तर काही ठिकाणी केवळ ३० ते ४५ मिलिमीटर एवढाच अल्प पाऊस झालेला आहे. वडवणी, अंबाजोगाई आणि परळी तालुक्यात बहुतांश महसूल मंडळात पाऊस नसल्याने अजून पेरण्या झालेल्या नाहीत. बीड तालुक्यात देखील राजुरी महसूल मंडळात अत्यल्प पाऊस आहे.

पंचाहत्तर मिमी पाऊस असेल तरच पेरणी करा, कृषी विभागाचा सल्ला

ज्या ठिकाणी महसूल मंडळात अत्यल्प पाऊस आहे. त्या मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये. येणाऱ्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कमी पावसावर पेरणी केली तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. यामुळे ७५ मि. मी. पेक्षा अधिक पाऊस पडल्या शिवाय पेरणी करू नका असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

Intro:75 मी. मी. पाऊस असेल तरच पेरणी करा; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

बीड- जिल्ह्यात जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये एकूण 51.0 मी. मी. पाऊस झाला आहे . ज्या तालुक्यात अथवा महसूल मंडळात 75 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला असेल त्याच शेतकऱ्यांनी पेरणी करावी अन्यथा पावसाची वाट पहावी. पिकासाठी आवश्यक पाऊस हा 75ml मिलिमीटरपेक्षा जास्त आवश्यक आहे याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन बीड जिल्हा कृषी विभाग यांच्यावतीने तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे. बीड जिल्ह्यात काही भागात समाधानकारक आहे तर काही ठिकाणी पेरणीला अजून सुरुवातच नाही. सोमवार पर्यंत जिल्ह्यात 45 टक्के पेरणी झाला असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

Body:कृषी विभागाच्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात 45 टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. परंतु अद्यापही बहुतांश भागात पाऊस झालेला नसल्याचे चित्र पाहायला मिळते. जिल्ह्यातील काही महसूल मंडळात पाऊस 110 ते 120 मिलिमीटर एवढा पडला आहे. तर काही ठिकाणी केवळ 30 ते 45 मिलिमीटर एवढाच अल्प पाऊस झालेला आहे. वडवणी, अंबाजोगाई व परळी तालुक्यात बहुतांश महसूल मंडळात पाऊस नसल्याने अजून पेरण्या झालेल्या नाहीत. बीड तालुक्यात देखील राजुरी महसूल मंडळात अत्यल्प पाऊस आहे.

Conclusion:ज्या ठिकाणी महसूल मंडळात अत्यल्प पाऊस आहे. त्या मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये. येणाऱ्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कमी पावसावर पेरणी केली तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. यामुळे 75 मि. मी. पेक्षा अधिक पाऊस पडल्या शिवाय पेरणी करू नका असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.