बीड : आपण अनेक वेळा पाहतो की, आई वडील वयोवृद्ध झाले की ते निकामी होतात आणि अनेक वेळा आई-वडिलांचे होणारे छळ आपण आपलेच मुलं करीत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. एकीकडे ज्या बापाने ज्या मुलांना जन्म दिला त्याच बापाला आज वाऱ्यावर सोडल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली ज्या वडिलांनी लहानाचे मोठे केले हौस लाड पुरवले सणासुदीला नवे कपडे घेतले त्याच बापाला आज घराच्या बाहेर हाकलून दिल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली विशेष म्हणजे पती-पत्नी यांनी दोघांनी एकत्र राहायला पाहिजे होते. मात्र पत्नीने सुद्धा आपल्या पतीला या घरात राहू नको असे म्हणत गेल्या दहा वर्षापासून हे ग्रस्त बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वन वन फिरत आहेत. मात्र अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार देऊनही पोलीस दखल घेत नाहीत मात्र या मागचे काय कारण असेल...? चक्क व्यक्तीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून (Grandfather Letter To CM Shinde) कळवले की, जर मला न्याय (demand for justice) मिळाला नाही तर मला आत्महत्या करण्यासाठी परवानगी (demand Allow suicide to CM) द्या. अशीच मागणी या पत्रातून केली आहे. मात्र या व्यक्तीला न्याय मिळणार का हेच पाहणे उचित्याचे ठरणार आहे. याविषयीचा ईटीव्ही भारत चा एक स्पेशल रिपोर्ट... (Latest News from Beed)
काय लिहिले पत्रात ?
माझे नाव माणिक बाप्पाजी रायकर असून मी धारूर तालुक्यात संगम येथील आहे. मला मुलं व बायको घरी येऊ देत नाहीत, माझ्या नावावरील जमीन नावावर करून घेतली आहे. जमीन असू नये त्याचा उपयोग होत नाही चार चार दिवस उपाशी राहण्याची वेळ येत आहे, माझं वय झालं आहे आता काम होत नाही कुठपर्यंत काम तरी करायचं... मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे की मी आत्मदहन करणार आहे, मला जर न्याय मिळाला नाही तर मी आत्मदहन करणार आहे, गेली दहा वर्षापासून मी बाहेरच फिरत आहे. माझ्या भावाच्या घरी मी राहतो अनेक गावात नोकरी करून मी पोर पोट भरले सर्व गावकऱ्यांना माहिती आहे. पोलिसांना तक्रार दिली एसपींना तक्रार दिली पण त्यांनी काहीच केलं नाही. पैसे खाल्ले आणि आमदारांच्या फोनवर त्यांनी बंद केलं व दहा पाच दहा पाच रुपये घेतात आणि गप्प बसतात, माझी 8 एकर 32 गुंठे जमीन आहे, संगम या गावांमध्ये माझी जमीन आहे व पूर्ण बागायती जमीन आहे सध्या शेतामध्ये ऊस आहे, माझ्या परस्पर माझी जमीन नावावर करून घेतली तलाठ्याने धोका देऊन सह्या करायला लावल्या, आणि घेतलं ते अज्ञान पालक म्हणून हाणामारी दोन-चार वेळेस झाली आहे. माझ्या मुलानेच मला हाणामार केली आहे. दोन चार वेळेस पोलीस स्टेशनला अर्ज दिले आहेत. मला मुलगी नाही दोन मुलं आहेत, दोन्ही मुलं शेती करत आहेत एका मुलाकडे ट्रॅक्टर आहे. मोठ्या मुलाकडे जनावरे आहेत दुधाचा व्यवसाय करतो, शेवटचा पर्याय आहे म्हणून मुख्यमंत्री साहेबांना मी पत्र लिहिले आहे. नसता मी आत्महत्या करणार आहे.