बीड : युवा सेना नेते आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी (Aditya Thackeray will join Bharat Jodo Yatra) होणार आहेत. येणाऱ्या 11 तारखेला ते नांदेड येथे होणाऱ्या सभेला हजेरी (Aditya will meet Rahul Gandhi on 11th November) लावणार असून; यावेळी राहुल गांधींची ते भेट घेणार आहेत. अदित्य ठाकरे हे सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बीडच्या गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे शेताच्या बांधावर जाऊन पहाणी केली आहे. यादरम्यान त्यांनी मीडियाशी बोलतांना ही माहिती दिली आहे.
राज्यात दोन सभा घेणार : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. त्याचवेळी काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दाखल झाली. जनतेशी जोडण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काढण्यात आलेली ही यात्रा महाराष्ट्रात 14 दिवस चालणार असून 15 विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघातून ती जाणार आहे. त्याचवेळी राहूल गांधी 10 आणि 18 नोव्हेंबर रोजी राज्यात दोन सभा घेणार आहेत. युवा सेना नेते आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. येणाऱ्या 11 तारखेला ते नांदेड येथे होणाऱ्या सभेला हजेरी लावणार असून; यावेळी राहुल गांधींची ते भेट घेणार आहेत.
20 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात दाखल : महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत 382 किलोमीटरचे अंतर कापून ही यात्रा 20 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात दाखल होणार आहे. महाराष्ट्रात ही यात्रा नांदेड जिल्ह्यात पाच दिवस राहणार असून तेथून ११ नोव्हेंबरला हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करून १५ नोव्हेंबरला वाशिम जिल्ह्यात पोहोचेल. संविधान आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे हे या यात्रेचे उद्दिष्ट असे काँग्रसेच्या नेत्यांनी म्हटले आहे. गेल्या आठ वर्षांत देशाने भ्रष्टाचार, भीती आणि गरीबी पाहिली आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात देशातील समस्यांवर एकमुखाने चर्चेची मागणी केली.
शरद पवार उद्धव ठाकरेंना निमंत्रण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना यात्रेतील सहभागाबाबत विचारले असता, काँग्रेसने दोन्ही नेत्यांना निमंत्रण पाठवले असून; ते यात्रेत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या यात्रेत विविध क्षेत्रातील 100 हून अधिक प्रतिष्ठित लोक सहभागी होतील, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले होते.