ETV Bharat / state

वैद्यनाथ पर्यटन विकास कार्यक्रमासंदर्भात आदिती तटकरेंनी घेतली बैठक - Aditi Tatkare Latest News

पर्यटन राज्य मंत्री आदिती तटकरे यांनी आज परळी वैद्यनाथ पर्यटन विकास कार्यक्रमाबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये विकास कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

वैद्यनाथ पर्यटन विकास कार्यक्रमासंदर्भात बैठक

author img

By

Published : Mar 24, 2021, 8:49 PM IST

परळी (बीड) - पर्यटन राज्य मंत्री आदिती तटकरे यांनी आज परळी वैद्यनाथ पर्यटन विकास कार्यक्रमाबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये विकास कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

60 हेक्टर जागेत साकारणार प्रकल्प

परळी वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे परळीमध्ये एक पर्यटन केंद्र असावे अशी संकल्पना धनंजय मुंडे यांनी मांडली होती. परळी नजीक वनखात्याची 200 हेक्टर जमीन आहे. त्यापैकी 60 हेक्टर म्हणजेच 150 एकर जमिनीवर वैद्यनाथ पर्यटन हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या विकास आराखड्यामध्ये बालोद्यान, निसर्ग परिचय केंद्र, स्थानिक वस्तूंचे संग्रहालय, ग्रीन जीम, बेलवन, आम्रवन, तुळशी वन, बांबु वन, काटेरी वन, रॉक गार्डन, पर्णकुटी, पॅगोडा, गझीबो, नैसर्गिक पथरस्ते, 2 लक्ष रोपांची वृक्ष लागवड व संवर्धन, सौरदिवे, वाहनतळ यांसारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परळीच्या पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.