ETV Bharat / state

कामात हलगर्जीपणा; आष्टीत डॉक्टरसह सात जण कार्यमुक्त, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची कारवाई

author img

By

Published : May 22, 2021, 5:14 PM IST

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार हे आष्टी शहरातील आयटीआयमध्ये असलेल्या सीसीसी सेंटरमध्ये अचानक भेट देण्यास गेले होते.

ashti
कोविड सेंटरची पाहणी करताना

आष्टी(बीड) - अचानक बीड जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आष्टी शहरातील आयटीआय येथील सीसीसी सेंटरमध्ये भेट दिली. त्यावेळी त्यांना कोरोना रुग्ण बाहेर फिरताना दिसून आले. यात कामचुकारपणा करणारे डॉक्टर, नर्स व वार्डबॉय दिसल्याने त्यांना तत्काळ कार्यमुक्तीचा आदेश दिला आहे.

आष्टी शहरात शनिवारी (22 मे) पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा दौरा असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी हे आष्टीच्या दौऱ्यावर आले होते. सकाळी अकरा वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार हे आष्टी शहरातील आयटीआयमध्ये असलेल्या सीसीसी सेंटरमध्ये अचानक भेट देण्यास गेले. परंतु, कोरोनावर उपचार घेत असलेले रुग्ण आयटीआय परिसरात फिरताना दिसले, तर तिथे कर्तव्यावर असलेल्या आरोग्य अधिकारी हे आयटीआय च्या दुसऱया इमारतीत बसल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर डॉ. आर.बी.पवार यांनी कोविड सेंटरमध्ये जाऊन पाहणी केली असता, त्याठिकाणी काम करत असलेले वार्डबॉय हे कर्तव्यावर नसून, कोविड सेंटरमध्ये स्वच्छता नसल्याचे दिसून आले. याबाबीचे गांभिर्य लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ताशेरे ओढत तिथे कर्तव्यावर असलेल्या आरोग्य अधिकारी डॉ.माधुरी पाचरणे यांच्यासह एएनएम(नर्स) आश्विनी पाणतवणे, रुपाली काळे व वार्डबॉय निखील वाघूले, आकाश राऊत, सुमित धोंडे, भारत राऊत यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले आहे.

गय केली जाणार नाही - डॉ. नितीन मोरे

सध्या सीसीसी केंद्रात 109 रुग्ण उपचार घेत असून, यासाठी सात डॉक्टर, आठ नर्स व 12 वार्डबॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येकांनी आपआपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे असतानाही कामात हालगर्जीपणा करतात, असे जर पुन्हा दिसून आले तर त्या अधिकारी व कर्मचाऱयांची गय केली जाणार नाही, असा इशारा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी दिला आहे.

रुग्ण गेटच्या बाहेर जातात कसे?

दरम्यान, उपचार घेत असलेले रुग्ण सीसीसी केंद्रातून गेटच्या बाहेर डॉक्टर, वार्डबॉय व विशेष म्हणजे गेटवर पोलीस कर्मचारी असूनसुद्धा कोरोना रुग्ण गेटच्या बाहेर कसे जातात यावरून तुम्ही कर्तव्य किती जबाबदारीने पार पाडतात हे दिसून आले आहे. आपणाला कर्तव्याचे भान नसेल तर काम करू नका, असे खडे बोल सुनावत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी अधिकारी व कर्मचारी यांना झापले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.