बीड - जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना आज (बुधुवार) घडली. बीड जिल्ह्यात कोरोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली असून, बीड जिल्ह्यातीस बाधितांचा आकडा हा 424 च्या वर गेला आहे. यापैकी 210 रुग्ण उपचार घेत असून 193 रुग्ण कोरनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेवराई शहरातील गजानन नगर परिसरातील एक 68 वर्षीय कोरोनाबाधित महिला जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. तर गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथील 70 वर्षीय रुग्णाचा मंगळवारी पहिला स्वॅब निगेटिव्ह आला, त्यामुळे सदरील रुग्ण घरी नेल्यानंतर संध्याकाळी मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीचा स्वॅब घेऊन तपासणी केली असता या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारण त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी अनेकांनी हजेरी लावली होती.
बीडमध्ये कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू; दोघेही गेवराई तालुक्यातील रहिवाशी - corona news
जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना आज (बुधुवार) घडली. बीड जिल्ह्यात कोरोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली असून, बीड जिल्ह्यातीस बाधितांचा आकडा हा 424 च्या वर गेला आहे.