ETV Bharat / state

औरंगाबाद : विदेशात जाणाऱ्या युवकांच्या लसीकरणाचा सुरुवात

औरंगाबाद महानगरपालिकेच्यावतीने विदेशात शिक्षण किंवा नौकरी करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यामुळे विदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांनी सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी केली होती.

vaccination of youth for going abroad
औरंगाबाद : विदेशात जाणाऱ्या युवकांच्या लसीकरणाचा सुरुवात
author img

By

Published : Jun 3, 2021, 5:48 PM IST

औरंगाबाद - राज्यात लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे, त्यात महत्त्वाचा टप्पा म्हणून औरंगाबाद महानगरपालिकेच्यावतीने विदेशात शिक्षण किंवा नौकरी करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.

प्रतिक्रिया

शहरात तीन ठिकाणी विशेष लसीकरण -

औरंगाबाद शहरात बन्सीलाल नगर, औरंगपुरा आणि मुकुंदवाडी या तीन ठिकाणी विशेष लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील तीन दिवस युवकांसाठी ही मोहीम सुरू असणार आहे. विदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्या युवकांना आपला पासपोर्ट, परदेशी प्रवेश झाला असेल तर त्याचे कागदपत्र देणे सक्तीचे करण्यात आले असून कागदपत्रांची पडताळणी केल्यावरच त्यांची नोंदणी करून लसीकरण केले जात आहे.

सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर युवकांची गर्दी -

औरंगाबाद महानगरपालिकेच्यावतीने विदेशात जाऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी लसीकरण सुरू केल्याच जाहीर करताच सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर विद्यार्थी आणि युवकांनी मोठी गर्दी केली होती. लसीकरणासाठी आलेल्या युवकांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यावर नोंदणी करून युवकांचे लसीकरण करण्यात आले. दोन महिन्यात बाहेर देशात जाण्यासाठी परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यावेळी लसीकरण झालेल्या युवकांना प्राधान्य असेल, शिवाय लसीकरण झाले असल्यास इतर देश देखील येण्यास परवानगी देतील, तिथे गेल्यावर अलगिकरण होण्याची गरज लागणार नाही, त्यामुळे विदेशात जाण्याची संधी मिळाल्यावर ती संधीचा जाऊ नये म्हणून लसीकरण महत्त्वाचे असल्याने लस घेतल्याचे मत लस घेण्यासाठी आलेल्या पृथ्वीराज सिंग राजपूत याने व्यक्त केले.

हेही वाचा - अप्पा... लोकसेवेचा तुमचा वसा पूर्ण करण्यासाठी आयुष्य वेचेन; धनंजय मुंडे यांची भावनिक पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.