औरंगाबाद - मराठवाडा वैधानिक विकास महामंडळचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या घरावर दगडफेक करत घरासमोर उभी कार दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी फोडल्याची घटना काल (शुक्रवारी) रात्री 8 वाजताच्या सुमारास समतानगर भागात घडली.
हेह वाचा -
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: तिन्ही आरोपींची शिक्षणाची मागणी फेटाळली
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी महापौर डॉ. भागवत कराड यांच्या घरावर काल रात्री 8 वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी तुफान दगडफेक केली. कराड यांची आलिशान कार हल्लेखोरांनी फोडली. तसेच घराच्या पहिल्या मजल्यापर्यंत दगडफेक करण्यात आली. ही घटना घडली तेव्हा कराड हे त्यांच्या घराच्या तळमजल्यावरील कार्यालयामध्ये अभ्यंगतांशी चर्चा करत होते. आवाज ऐकून ते बाहेर येईपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.
ही घटना समजताच क्रांतीचौक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र, परिसरात सीसीटीव्ही नव्हता. गाडी फोडल्याची माहिती कळताच भाजपचे आमदार अतुल सावे, प्रवक्ते शिरीष बोराळकर सह भाजप नेत्यांनी कराड यांचे घर गाठले. भाजपचे शिष्टमंडळ घटनेप्रकर्णी रात्री पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात आरोपीच्या अटकेसाठी या नेत्यांनी ठिय्या मांडला होता.
हेही वाचा -