औरंगाबाद- जिल्ह्याच्या पळशी गावात शेततळ्यात पडलेल्या दोन अजगरांची सुटका करण्यात सर्पमित्रांना यश आले आहे. सुटका करण्यात आलेल्या दोन अजगरांमध्ये दहा फुटांचा एक आणि सहा फुटांचा एक अजगर होता.
पाळशीच्या डोंगरांमधून हे अजगर भक्षाच्या शोधात आल असता पाण्यात पडले असावेत आणि शेततळ्याच्या बाजूला असलेल्या पान कापडमुळे त्यांना वर येता आले नसल्याचा अंदाज सर्पमित्रांनी व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर तीन-चार दिवसांपासून हे अजगर उपाशी असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.
औरंगाबाद येथील सर्पमित्र जाधव यांना पळशी गावातून वैजनाथ पळसकर यांनी शेततळ्यात २ अजगर गेली दिवसांपासून दिसून येत असल्याची माहिती दिली. जाधव आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पळशी गावात पोहचले. त्यावेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अजगर दिसून आले. जाधव आणि त्यांचे सहकारी दोरीच्या साहाय्याने शेततळ्यात उतरले. सावधानपूर्वक त्यांनी दोन्ही अजगर पकडले. शेततळ्याच्या पाण्याजवळ अजगराच्या खाद्य मिळते म्हणून हे अजगर पाण्याजवळ आले असता ते पाण्यात पडल्याचा अंदाज सर्पमित्रांनी व्यक्त केला. शेततळ्यातून अजगराला बाहेर पडता आले नसल्याने हे अजगर शेततळ्यात अडकून बसले असल्याने गेली तीन-चार दिवस अजगारांना अन्न मिळाले नसल्याने ते उपाशी असल्याचा अंदाज सर्पमित्रांनी व्यक्त केला. पकडलेल्या अजगरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.