ETV Bharat / state

वैजापूरजवळील नागपूर-मुंबई हायवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार - vaijapur taluka latest news

याकूब अणि नासेर हे दोघे मित्र शुक्रवारी सकाळी मिस्त्री कामानिमित्त एका खेड्यात गेले होते. काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने घरी वैजापूरला परतत होते. हायवे महामार्गावर भग्गाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दोघे दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले. यात नासेर जागीच ठार झाल तर याकूब यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

accident
अपघातात ठार झालेले
author img

By

Published : Jul 11, 2021, 3:18 PM IST

औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील नागपूर-मुंबई हायवेवर शुक्रवारी रात्री ११ वाजता भीषण अपघात झाला. भग्गाव फाट्याजवळ उभ्या असलेल्या एक पादचारी आणि डबलसीट दुचाकीस्वारांना भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याची माहिती समोर आली. या अपघातात दोघेजण ठार झाले. नासेर अनीस शेख (वय २७, रा.कादरी नगर, वैजापूर) अणि जगन्नाथ राडोड ( ३५, रा.भगगांव) अशी ठार झालेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत. तर याकूब अहेमद शेख ( ३६) रा.कादरी नगर वैजापुर हा तरुण गंबीर जखमी असून त्याला औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

या अपघाताची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की याकूब अणि नासेर हे दोघे मित्र शुक्रवारी सकाळी मिस्त्री कामानिमित्त एका खेड्यात गेले होते. काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने घरी वैजापूरला परतत होते. हायवे महामार्गावर भग्गाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दोघे दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले. यात नासेर जागीच ठार झाल तर याकूब यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले आहे. यावेळी त्याच वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या जगन्नाथ राठोड यांना ही धडक दिली. तेही या अपघातात मृत झाले आहेत. वैजापूर पोलिसांनी रात्री उशिरा पर्यन्त पंचनामा करुन पुढील तपास सुरू केला आहे.

गंगापूर-वैजापूर महामार्गावर टेम्पो आणि दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू

गंगापूर-वैजापूर महामार्गावर ११ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गंगापूर शहराच्या एक किलोमीटर अंतरावरावरील थोरात पेट्रोल पंपाजवळ टेम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने अपघात घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू झाला. अब्दुल हक अब्दुल रशीद कुरेशी, असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो मन्सुरी कॉलनी गंगापूर येथील रहिवासी आहे.

सिल्लोड : रस्त्यावर उभ्या लोकांना उडवणाऱ्या वाहन चालकास अटक, तीन ठार तर सहा जखमी

सिल्लोड तालुक्यातील भराडी रस्त्यावरील वाडी फाट्याजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या १५ जून रोजी लोकांना उडवून देणाऱ्या कार चालकास सिल्लोड शहर पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड तालुक्यातील भराडी रस्त्यावरील वाडी फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना उडवून देणाऱ्या कार चालकास सिल्लोड शहर पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सिल्लोड न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे. शेख जाहेद मोहमद अनिस असे आरोपीचे नाव आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.