ETV Bharat / state

हॉटेलच्या परमिट रूमचे कुलूप तोडून सव्वा लाखांची दारू लंपास; चोरटा ताब्यात - MIDC police station

औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील जैनस्पिनर स्टॉप येथील हॉटेल न्यू दुर्गा चे परमिट रुम लॉकडाऊन असल्याने सील करुन बंद केलेले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी हॉटेलमधील एक कामगार नेहमीप्रमाणे हॉटेलची पाहणी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले.

MIDC police station paithan
एमआयडीसी पोलीस स्टेशन पैठण
author img

By

Published : Apr 12, 2020, 2:14 PM IST

पैठण (औरंगाबाद) : पैठण शहरातील औरंगाबाद रस्त्यावरील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या 'हॉटेल न्यू दुर्गा'मधील परमिट रूममधून दारू चोरल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी हॉटेलच्या परमीट रुमच्या दरवाज्याचे कुलूप तोडुन १ लाख १५ हजार ९३२ रुपयांच्या विदेशी दारूचे बॉक्स चोरून नेले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून काही प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा... तिहेरी हत्याकांड.. अज्ञाताकडून महिलेसह तीन जणांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या

औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील जैनस्पिनर स्टॉप येथील हॉटेल न्यू दुर्गा चे परमिट रुम लॉकडाऊन असल्याने सील करुन बंद केलेले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी हॉटेलमधील एक कामगार नेहमीप्रमाणे हॉटेलची पाहणी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने लगेचच हॉटेल मालक ईश्वर परदेशी आणि मॅनेजर सुमित कांबळे यांना याबाबत सांगितले. या सर्वांनी हॉटेलची पाहणी केली असता परमिट रूममधील विदेशी दारूचे बॉक्स चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांच्याकडे याबात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विद्या झिरपे, बीट जमादार खंडू मंचरे, कोमल देहाडराय, संजय मोरे, तुकाराम मारकळ यांनी तत्काळ पंचनामा करून पोलीस उपअधीक्षक गोरख भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास केला. पोलिसांनी या चोरी प्रकरणी एक आरोपी अमजद शेख (रा. पिंपळवाडी ता. पैठण) याला अटक केली. त्याला पैठण येथील न्यायालयात हजर केले असता दि. १३ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्याच्याकडून चोरून नेलेल्या दारूच्या बाटल्या काही प्रमाणावर ताब्यात घेतल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.