ETV Bharat / state

दुष्काळाच्या झळा : सरकार जनावरं मरण्याची वाट पाहत आहे का? शेतकऱ्यांचा सवाल - farmers

सरकार जनावरं मरण्याची वाट पाहत आहे का? दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सवाल... जनावरांसाठी दिवसाकाठी किमान ५ पेंड्या घ्याव्या लागत असल्याने दिवसाला १५० रुपये चाऱ्यावर करावा लागतोय खर्च...मात्र, अशा परिस्थितीतही शासनाकडून चारा छावणी सुरू करण्याबाबत कुठलीही हालचाल होताना दिसत नाही.

दुष्काळामुळे चाराटंचाईचे संकट
author img

By

Published : Mar 21, 2019, 10:30 AM IST

औरंगाबाद - सरकार शेतकऱ्यांची जनावरं मरण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुष्काळामुळे मराठवाड्यात भीषण पाणी आणि चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. मात्र, अशा परिस्थितीतही शासनाकडून चारा छावणी सुरू करण्याबाबत कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. परिणामी शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी महिन्याकाठी हजार रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे. टंचाईच्या काळात चाऱ्याची एक पेंडी साधारणतः तीस रुपयाला विकत घ्यावी लागत आहे.

दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल

पैठण तालुक्यातील बालानगर येथील जगन्नाथ कुटे यांच्याशी या दुष्काळाबाबतची चर्चा केली असता, चारा टंचाईची दाहकता समोर आली. जगन्नाथ कुटे यांच्याकडे स्वतःची शेती नाही. मात्र, त्यांच्याकडे तीन जनावरे आहेत. मात्र, या दुष्काळामुळे दावणीवरची ही जनावरे जगवण्यासाठी त्यांना मोठी धडपड करावी लागत आहे. कुटे म्हणतात, की ३ जनावरं आहेत. मात्र, चारा टंचाईमुळे जनावरं जगवण्यासाठी मिळेल तिथून चारा विकत आणावा लागतोय. परतु, दुष्काळामुळे झालेल्या चारा टंचाईमुळे चाऱ्याचे भावही गगनाला भिडले आहेत. साधारण तीस रुपयांना एक पेंडी विकत घ्यावी लागत आहे. तीन जनावरांसाठी दिवसाकाठी किमान ५ पेंड्या घ्याव्या लागत असल्याने दिवसाला १५० रुपये केवळ चाऱ्यावर खर्च करावा लागत असल्याचे कुटे यांनी सांगितले. एकूणच दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुष्काळासारखे अस्मानी संकट कोसळले असताना, सरकारकडून चाऱ्यासाठी मदत होत नसल्याने या सुलतानी संकटात जनावरं जगवायची कशी? असा सवाल जगन्नाथ कुटे यांनी उपस्थित केलाय.

यंदाच्या भीषण दुष्काळामुळे चाराटंचाई सोबतच पाणीटंचाईचाही सामना करावा लागत असल्याची व्यथा जगन्नाथ कुंटे यांनी यावेळी सांगितली. प्यायला पाणी नसल्यामुळे जनावरांसाठी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न आहे. त्यामुळे टॅंकरने पाणी विकत घेऊन जनावरांना पाजण्याची वेळ कुटे कुटुंबीयांवर आली आहे. पाण्यासाठी दिवसाकाठी शंभर ते दीडशे रुपयांचा खर्च हा यांना करावा लागत असल्याने जवळपास महिन्याला तीन हजार रुपयांचा खर्च केवळ पाण्यावर करावा लागत आहे. एवढा सगळा खर्च करण्यासाठी या कुटुंबातील सर्वच सदस्यांना शेतमजुरी करावी लागत असल्याचेजगन्नाथ यांचा मुलगा दादासाहेब कुटे यांनी सांगितले. एकूणच दुष्काळामुळे शेतकरी वर्ग मोडकळीस आला आहे. दावणीवरची जनावरे जगवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र प्रशासन यांच्याकडे बघायला देखील तयार नसल्याने सध्या त्यांना अस्मानी संकटासोबत सुलतानी संकटाचाही सामना करावा लागत आहे.

ही परिस्थिती एकट्या कुटे कुटुंबीयांची नाही, तर मराठवाड्यातील लाखो शेतकरी या चारा आणि पाणी टंचाईचा सामना करत आहेत. एकीकडे जनावरे जगवण्यासाठी चारा विकत घेण्याची वेळ आली असताना प्रशासन मात्र चारा छावण्यांना मंजुरी द्यायला तयार नाही. दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन सरकारने दिले होते. मात्र, तेच सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीवर लाथ घालून जनावर मारायला भाग पाडतय का? असा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालाय.

Intro:सरकारला शेतकऱ्यांची जनावर मरण्याची वाट पाहिजे का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. गेल्या काही महिन्यांपासून दुष्काळामुळे भीषण चाराटंचाई शेतकऱ्यांना जाणवत आहे. मात्र अशा परिस्थितीत प्रशासन चारा छावण्या देखील सुरू करत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी महिन्याकाठी हजार रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे.

Body:टंचाईच्या काळात चाऱ्याची एक पेंड साधारणतः तीस रुपयाला शेतकऱ्यांना विकत घ्यावी लागत आहे. अशा परिस्थितीत सरकार चारा छावण्या सुरू करत नाही हा प्रश्न पडलाय.

Conclusion:vo1 - पैठण तालुक्यातील बालानगर येथील जगन्नाथ कुटे यांना सध्या चाराटंचाईचा भीषण प्रश्न भेडसावतोय. जगन्नाथ कुटे त्यांच्याकडे स्वतःची अशी शेती नाहीये, मात्र त्यांच्याकडे तीन जनावरे आहेत. ही जनावरे जगवण्यासाठी त्यांची वेगळी धडपड ही आता या दुष्काळात सुरू झाली आहे. तीन जनावरं मात्र चारा नाही त्यामुळे त्यांना मिळेल तिथून चारा विकत आणून जनावरे जगण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत साधारण तीस रुपयांना एक पेंड विकत घ्यावे लागत आहे. तीन जनावरांसाठी दिवसाकाठी किमान पाच पेंड्या या जगन्नाथ कुटे यांना लागत असतात. त्यामुळे चाऱ्यासाठी रोजचा दोनशे रुपयांचा खर्च हा जगन्नाथ यांना करावा लागतो. अशा परिस्थितीत चाऱ्यासाठी मदत न करणाऱ्या सरकारला आमची जनावरं जगवायची आहेत का नाही असा प्रश्न जगन्नाथ यांना पडला.

जगन्नाथ कुटे - शेतमजूर

vo2 - चाराटंचाई सोबतच पाणीटंचाईचा सामना जगन्नाथ कुंटे यांच्या कुटुंबियांना करावा लागतोय प्यायला पाणी नसल्यामुळे जनावरांसाठी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न आहे. त्यामुळे टॅंकरने पाणी विकत घेऊन जनावरांना पाजण्याची वेळ कुटे कुटुंबीयांवर आली आहे. पाण्यासाठी दिवसाकाठी शंभर ते दीडशे रुपयांचा खर्च हा यांना करावा लागत असल्याने जवळपास महिन्याला तीन हजार रुपयांचे पाणी जनावरांसाठी त्यांना विकत घ्यावे लागते, त्यामुळे पूर्ण खर्च करण्यासाठी या कुटुंबातील सदस्यांना शेतमजुरी करावी लागते मात्र प्रशासन यांच्याकडे बघायला देखील तयार नाहीये.

byte - दादासाहेब कुटे - जगन्नाथ यांचा मुलगा.

vo3 - ही परिस्थिती एकट्या कुटे कुटुंबीयांचे नाही, मराठवाड्यात लाखो शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे. एकीकडे जनावरे जगवण्यासाठी चारा विकत घेण्याची वेळ आली असताना प्रशासन मात्र चारा छावण्यांना मंजुरी द्यायला तयार नाही. दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन सरकारने ददिलं होतं मात्र तेच सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीवर लाथ घालून जनावर मारायला भाग पाडतय का असा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.