ETV Bharat / state

Sanjay Shirsat on Aurangzeb grave : औरंगजेबाची कबर हैदराबादला हलवा, शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची मागणी - शारेक नक्शबंदींची शिरसाटांवर टीका

मुघल सम्राट औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथून हैदराबादला हलवावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Sanjay Shirsat on Aurangzeb grave
संजय शिरसाट
author img

By

Published : Mar 6, 2023, 2:25 PM IST

छत्रपती संभाजीनगर : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीने औरंगाबादचे नाव शनिवारी छत्रपती संभाजीनगर बदलल्याने त्या निषेधार्थ आंदोलन पुकारले. त्याला प्रत्यूत्तर म्हणून आमदार शिरसाट यांनी हे विधान केले आहे. जर त्यांचे औरंगजेबावर इतके प्रेम असेल तर औरंगजेबची कबर हैद्राबादला हलवा. त्यांना तेथे स्मारक बांधू द्या किंवा त्यांना हवे ते करू द्या, कोणीही त्रास देणार नाही, परंतू हे आंदोलन थांबवा, असे शिरसाट यांनी जाहीर केले.

समाजात असंतोष निर्माण करण्याचा हेतू : छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे अध्यक्ष शारेक नक्शबंदी शिरसाटांची मागणी केवळ राजकारण आणि त्यांचे स्थान मजबूत करण्यासाठी केला आहे. समाजामध्ये असंतोष निर्माण करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर त्यांच्या मनात औरंगजेबाबद्दल इतका द्वेष असेल, तर मग त्यांनी जी-20 प्रतिनिधींना औरंगजेबाची पत्नी राबिया-उल-दौरानी यांची 1668 मध्ये बांधलेली समाधी पाहण्यासाठी का घेऊन गेले. तसेच त्यांचा मुलगा मुहम्मद आझम शाह याने बांधलेली 'बीबी का मकबरा' पाहण्यासाठी का नेले? असा प्रतिवाद शारेक नक्शबंदी यांनी केला.

लोकांपर्यंत जाण्यासाठी मुद्दे उरले नाहीत : शारेक नक्शबंदी म्हणाले की, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडे लोकांपर्यंत जाण्यासाठी कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत. म्हणून अशा राजकारणाचा अवलंब करत आहेत आणि समाजामध्ये फूट पाडत आहेत. औरंगाबादचे नाव बदलून 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्राने गेल्या महिन्यात मंजूर केला. दरम्यान, गेल्या आठवड्यात एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मागणी केली होती की मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि मालेगावची नावे देखील महत्त्वाच्या व्यक्तींच्या सन्मानार्थ बदलली पाहिजेत. त्यांनी छत्रपती शिवाजी राजे महानगर (मुंबई), ज्योतिबा-सावित्री फुले नगर (पुणे), डॉ.बी.आर.आंबेडकर नगर (नागपूर), छत्रपती शाहू महाराज नगर (कोल्हापूर) आणि मौलाना आझाद नगर (मालेगाव) सुचवली होते.

हेही वाचा : Dhiraj Deshmukh Jai Karnataka : आमदार धीरज देशमुखांचा बेळगावात 'जय कर्नाटक'चा नारा, सीमावाद नव्याने चिघळणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.