ETV Bharat / state

Samruddhi Mahamarg Accident: 'समृद्धी'वरील 12 जणांच्या मृत्यूला RTO जबाबदार? अपघातापूर्वी ट्रक थांबवल्याचा व्हिडिओ समोर - १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर शनिवारी (१५ ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास एका खासगी ट्रॅव्हल्स गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर २३ प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झाला असल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आलं आहे. आता आरटीओ अधिकाऱ्यांनी हा ट्रक थांबवून ठेवल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Samruddhi Mahamarg Accident
'समृद्धी'वरील 12 जणांच्या मृत्यूला RTO जबाबदार? अपघातापूर्वी ट्रक थांबवल्याचा व्हिडीओ समोर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 12:30 PM IST

Updated : Oct 16, 2023, 2:45 PM IST

समृद्धी महामार्ग

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) : समृद्धी महामार्गावर शनिवारी (१५ ऑक्टोबर) मध्यरात्री टेम्पो ट्रॅव्हल एका ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तसंच हा अपघात आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झाला असल्याचा आरोप केला जात असून याप्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघाताच्या काही वेळ अगोदर ट्रक थांबवलेला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. ट्रक समृद्धी महामार्गावर जात असताना आरटीओने हा ट्रक अडवला होता आणि चालकासोबत कागदपत्र तपासणी करण्यात येत होती, असं या व्हिडिओतून स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळं हा अपघात कसा झाला असावा याचा अंदाज आता बांधला जातोय.

काय आहे व्हिडिओत : समृद्धी महामार्गावरील वाहनं तपासणीसाठी किंवा अन्य कारणासाठी अडवता येत नाही, असं असलं तरी शनिवारच्या रात्री साडेबाराच्या सुमारास आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक प्रदीप राठोड आणि नितीनकुमार गोणारकर यांनी ट्रक अडवला. शेवटच्या लेनवर ट्रक आणि आरटीओचे वाहन दोन्हीही एका बाजूला उभे करण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यामुळं जर आरटीओ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर ट्रक अडवला नसता, तर हा अपघात झाला नसता, असं अनेकांचं म्हणणं आहे.

दोन अधिकारी निलंबित : समृद्धी महामार्गावर अपघात प्रकरणी ट्रक चालक आणि आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिलीय. समृद्धी महामार्गावरून शनिवारी रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नाशिकच्या दिशेनं जात होता. त्यावेळी आरटीओच्या एका गाडीनं त्यांचा पाठलाग करत गाडी थांबवण्यास सांगितलं. मधल्या लेन मधून ट्रक चालकानं गाडी शेवटच्या लेनमध्ये आणली. आरटीओ अधिकारी कागदांची पडताळणी करत असताना ताशी शंभरहून अधिक वेग असलेली टेम्पो ट्रॅव्हलर गाडी ट्रकवर येऊन धडकली. या दुर्घटनेत बारा जणांनी आपला जीव गमावला. याप्रकरणी ट्रकचालक ब्रिजेश कुमार चंदेल व क्लीनर संतराम शिंदे यांना पोलिसांनी घटना घडल्यावर लगेच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर अपघाताची कारणं लक्षात घेता मोटर वाहन निरीक्षक प्रदीप राठोड आणि नितीन गोणारकर यांच्यावर वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा -

  1. Samruddhi Mahamarg Accident : समृद्धीवर अपघातात कारणीभूत असणाऱ्या 2 आरटीओ अधिकाऱ्यांना अटक
  2. Samruddhi Mahamarg Accident : अपघातात नात अन् सुनेचा मृत्यू; सासूचा मन सुन्न करणारा आक्रोश, गावावर शोककळा
  3. Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी'वर कसा झाला अपघात? बचावलेल्या बालकानं दिली धक्कादायक माहिती

Last Updated : Oct 16, 2023, 2:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.