औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी रुग्णालय) सुरक्षारक्षकाला रुग्णाच्या नातेवाईकांनी जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये सुरक्षारक्षकाच्या डोक्याला जखम झाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा घाटी रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बल बहादूर दमई (वय-39, मूळ, नेपाळ, ह.मु. जयसिंगपुरा, औरंगाबाद) असे जखमी सुरक्षा राक्षकाचे नाव आहे. बल बहादूर हे रुग्णालयातील वार्ड क्रमांक 11 समोरच्या मोकळ्या जागेतील नातेवाईकांना बाजूला करण्याची कारवाई करत होते. तेव्हा दोन नातेवाईकांनी आम्हाला वार्डमध्ये जेवणाचा डबा द्यायला जायचे आहे, असे सांगून वाद घातला. त्यानंतर नातेवाईकांनी बल बहादुर यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा - केंद्र सरकारने थकविली ईसीएचएसची रक्कम; रुग्णालये थांबविणार विनारोकड सेवा
सुरक्षारक्षकाला झालेल्या मारहाणीमुळे पुन्हा एकदा घाटी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घाटीतील डॉक्टर, कर्मचारी, सुरक्षारक्षक यांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. नातेवाईकांना रुग्णालयापासून दूर ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.