औरंगाबाद- भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याने खुश आहे. मात्र, आरपीआयला एकही जागा न सोडल्याने मी नाखूश आहे. युतीची बोलणी सुरू असताना मला मुख्यमंत्र्यांनी फोन केला नाही, अशी नाराजी रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
दक्षिण मुंबई नाही तर ईशान्य मुंबईत मला एक तरी जागा द्या, अशी जाहीर मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे गुरुवारी (२१ फेब्रुवारी) आयोजित पत्रकार परिषदेत केली.शिवसेना आणि भाजप यांच्यात अडखळत का होईना लोकसभेसाठी शेवटी युती झालीच. शिवसेनेला २३ आणि भाजप २५ जागा असा २३-२५ चा फॉर्म्युला ठरला. मात्र, या जागा वाटपात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआय (आठवले गट) यांना एकही जागा न सोडल्याने रामदास आठवले नाराज आहेत. मला लोकसभेत जायची इच्छा आहे. युती झाल्याने खुश आहे मात्र जागा सोडल्याने मी नाखूश आहे, असे वक्तव्य केले.पत्रकार परिषद दरम्यान आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर स्तुतीसुमने उधळली. मोदींचे काम मोठे आहे, ते दलित समाजासाठी कार्य करत आहेत. काही विचारवंत समाजमाध्यमांवर मोदींना बदनाम करीत आहे. मोदींना कोणीही हरवू शकत नाही. कमळ अजून ५ वर्षे फुलणार आहे. हे कोमजणारे कमळ नाही, असे ते म्हणाले.भाजपच्या चिन्हावर लढणार नाहीआठवले आरपीआयसाठी लोकसभेची १ जागा मागत आहेत. याच विषयावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मी काँग्रेसमध्ये असतानाही काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविली नाही. भाजपने मला त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची ऑफर दिली तरी मी लढणार नाही. भाजपच्या चिन्हावर लढलो तर माझा पराजय होईल, अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली.आरपीआयचा सन्मान केला पाहिजे२०१४ च्या निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात दलित समाजाची मते मिळाली आहे. ती मते आरपीआयमुळे मिळाली. मी ज्या पक्षासोबत युती करतो त्या पक्षाला दलित समाज मोठ्या प्रमाणात मतदान करतो. आरपीआयला बाजूला सारून चालणार नाही. मित्रपक्ष म्हणून युतीत सन्मान मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीमुळे माझा विचार झाला नाही
वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढविण्याची जाहीर केल्याने ते युतीसाठी फायदेशीर ठरू शकते हे मीच मुख्यमंत्र्यांना पटवून दिले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार काँग्रेस आघाडीची मते विभाजन करण्यात मोठी भूमिका निभावणार आहे. त्यामुळेच माझा विचार झाला नाही, अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली.
Conclusion: