ETV Bharat / state

"कोरोनाच्या नावाखाली केंद्र सरकारला देशात अराजकता माजवायचीय"

author img

By

Published : Mar 13, 2020, 4:40 PM IST

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सहकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली.

prakash ambedkar
प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद - कोरोना हा इतका मोठा आजार नाही. या आजाराची भीती शासनाने पसरवली आहे. कोरोनापेक्षा टीबीने जास्त लोक मरतात. आपले अपयश लपवण्यासाठी सरकारच भीती पसरवत असल्याचा आरोप, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

"कोरोनाच्या नावाखाली केंद्र सरकारला देशात अराजकता माजवयाचीय"

हेही वाचा - कोरोना : मास्क अन् सॅनिटायझरचा काळाबाजार; पुण्यातील चार मेडिकल दुकाने सील

आंबेडकर म्हणाले, केंद्र सरकारला देशात अराजकता माजवायची आहे. अपयश लपवण्यासाठी त्यांना तस करायचं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही. सरकारला आपला खर्च भागवणे अवघड झाले आहे. सरकार देश चालवण्यात अपयशी होत आहे. त्यामुळे सरकारला देशात अराजकता माजवत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सहकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद आयोजित केली होती. या निवडणुका पुढे ढकलण्याची गरज नाही. आपल्याला अडचणी येतच राहतात. कोरोनामुळे निवडणूक रद्द करू नये, असही आंबेडकर म्हणाले आहेत.

एनपीआरची माहिती एनआरसीमध्ये वापरणार म्हणून, कागद पात्रांची आवश्यकता नाही, असे म्हणत असतील तर अमित शहा थापा मारत आहेत. आसाम आपल्या समोर उदाहरण आहे. 19 लाख लोक नागरिक नाहीत असे सांगण्यात आले. त्यांना डिटेन्शनकॅम्प मध्ये ठेवणार आहेत. 19 लाखात 14 लाख हिंदू आहेत. आता आम्हाला सांगा यांना नागरिकत्व कसे देणार? असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.