ETV Bharat / state

बनावट नोटांचा चलनात वापर करणाऱ्या दोघांना अटक - Two men using fake currency notes in aurangabad

बनावट नोटांचा चलनात वापर करणाऱ्या २ जणांना गंगापूर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून ३ हजार ३०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

aurangabad
बनावट नोटांचा चलनात वापर करणाऱ्या दोघांना अटक
author img

By

Published : Nov 29, 2019, 6:41 PM IST

औरंगाबाद - बनावट नोटांचा चलनात वापर करणाऱ्या २ जणांना गंगापूर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून ३ हजार ३०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बनावट नोटांचा चलनात वापर करणाऱ्या दोघांना अटक

संतोष विठ्ठल ढवळे (वय -४२, अमळनेर) आणि चंद्रशेखर व्होरा (वय -३८) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष ढवळे यांच्याकडून 50 च्या 52 बनावट नोटा, जुन्या 100 च्या 2 बनावट नोटा आणि नवीन 100 च्या 5 बनावट नोटा आशा एकूण 3 हजार 300 रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या. याप्रकरणी न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास स. पो. नि प्रल्हाद मुंढे हे करत आहेत.

Intro:बनावट नोटा चलनात वापर करणा-या दोघांना पकडले.
गंगापूर पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्या ताब्यातील ३३०० रुपये बनावट नोटा जप्त करुन दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

औरंगाबाद- गंगापुर तालुक्यातील अमळनेर येथे बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असणारा एका जणास गंगापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे रंगेहाथ पकडलेBody:पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील अमळनेर येथे एक इसम बनावट नोटा चलनात आणत असल्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना खबर्‍याने माहिती दिल्यामुळे २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सापळा लावून बनावट नोटा जवळ बाळगून त्या चलनात अनत आसतांना संतोष विठ्ठल ढवळे(४२) राहणार अमळनेर यास रंगे हात पकडले असून त्याचे जवळ 50 च्या बनावट 52 नोटा, जुने 100₹ च्या 2 बनावट नोटा आणि 100₹ च्या नवीन 5 बनावट नोटा आशा ऐकून 3300/-₹ बनावट मिळून आल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले व विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की सणसवाडी येथील ललित चंद्रशेखर व्होरा (३८) राहणार सनसवाडी जिल्हा पुणे याने वीटभट्टीवर कामाला येण्यासाठी मला दहा हजार रुपये दिले होते त्यापैकी मी सहा हजार सातशे रुपये दवाखाना व इतर खर्च केले उरलेली रक्कम माझ्याजवळ आहे धुळ्याच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे सपोनि प्रल्हाद मुंडे पोलीस संदीप डमाळे, उमेशु गुडे, जितेंद्र बोरसे, गणेश खंडागळे ,सोमनाथ मुरकुटे, कैलास निंभोरकर ,मनोज बेडवाल यांनी पहाटे चार वाजता सणसवाडी येते जाऊन त्यास पकडले दोघांना येथील न्यायालयासमोर उभे केले असता येथील न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे पुढील तपास सपोनि प्रल्हाद मुंढे हे करत आहे
Conclusion:या घटनेमुळे गंगापूर तालुक्यात व शहरात खळबळ उडाली आहे. बनावट नोटा तयार करण्याचे लोण आता गंगापूर ग्रामीण भागात पोहोचल्याने गंगापूरकरांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शंकाही व्यक्त केली जात आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.