ETV Bharat / state

EXCLUSIVE: कोरोनाकाळी जे डॉक्टर रुग्णांना देताहेत आधार, त्यांचेच रखडले पगार

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या 5 महिन्यांपासून रुग्णांवर उपचार करण्यासाठी निवासी डॉक्टर कष्ट घेत आहेत. जोखीम घेत उपचार करत असताना वेतन न देणे ही आमची चेष्टा नाही का? असा प्रश्न घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. वेतनाबाबत लवकर निर्णय न घेतल्यास कोरोनाच्या या संकटसमयी आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा मार्ड संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

औरंगाबाद निवासी डॉक्टर
औरंगाबाद निवासी डॉक्टर
author img

By

Published : Aug 9, 2020, 3:04 AM IST

औरंगाबाद- कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या लोकांना आधार देणाऱ्या डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांना कोरोनायोद्धा म्हणून गौरवण्यात येत आहे, मात्र औरंगाबादमध्ये याच कोरोना योद्धा डॉक्टरांचे दोन महिन्यांपासून विद्या वेतन रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुसते औरंगाबादच नव्हे तर राज्यातील अनेक ठिकाणी वेतन रखडल्याचा आरोप औरंगाबाद मार्ड संघटनेने केला आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या 5 महिन्यांपासून रुग्णांवर उपचार करण्यासाठी निवासी डॉक्टर कष्ट घेत आहेत. जोखीम घेत उपचार करत असताना वेतन न देणे ही आमची चेष्टा नाही का? असा प्रश्न घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. वेतनाबाबत लवकर निर्णय न घेतल्यास कोरोनाच्या या संकटसमयी आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा मार्ड संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

कोरोना योद्धा म्हणून डॉक्टरांचे कौतुक होत असतान त्यांना होणाऱ्या अडचणींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे. महामारीच्या काळात आपल्या आरोग्याची चिंता न करता निवासी डॉक्टर आहे त्या परिस्थितीत कोरोना रुग्णांची काळजी घेत आहेत. हे काम करत असताना आपल्या कुटुंबाची जबाबदारी आणि आपल्या मूलभूत गरजा भागवणे त्यांना अवघड झाले आहे. करण 2 महिन्यांपासून वेतन रखडल्याने या अडचणी येत आहेत. सरकार मुंबई, पुणे नागपूर या शहरांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना विद्या वेतन देते, मात्र इतर शहरात काम करणाऱ्या डॉक्टरांचे वेतन देण्यास विलंब का होतो? असा प्रश्न औरंगाबादच्या निवासी डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.

गेल्या 2 महिन्यांपासून पदसंख्या:

कनिष्ठ निवासी 1 - 183

कनिष्ठ निवासी 2 - 156

कनिष्ठ निवासी 3 - 151

वरिष्ठ निवासी - 36

इंटर्न- 200

एकूण- 726

वेतन रखडल्याने मार्ड संघटना बैठक घेणार असून राज्यसरकारने वेतनाबाबत निर्णय घेतला नाही, तर कोरोनाच्या काळातही निवासी डॉक्टर आंदोलन करतील, असा इशारा मार्डतर्फे देण्यात आला आहे. औरंगाबादच्या निवासी डॉक्टरांशी विशेष चर्चा केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

हेही वाचा- आरटीओकडून वाहनधारकांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मात्र, अनेकजण संभ्रमात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.