औरंगाबाद - मुख्यमंत्री 2014 मध्ये अनेक नेत्यांना अलिबाबा आणि चाळीस चोर म्हणाले होते, आता त्यांनी म्हणलेले चोर पक्षात का घेत आहेत? का त्यांचे 'सौ खून माफ केले'? सरकारने आधी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
हेही वाचा - भाजपची आज तिसरी मेगाभरती, हर्षवर्धन पाटलांसह गणेश नाईकांचा प्रवेश
हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही, मला आश्चर्य वाटले, इंदापूरच्या बाबतीत कुठलीही चर्चा नाही, त्यांनी निर्णय कसा घेतला माहीत नाही, राष्ट्रवादी त्यांना नाही का म्हणेल, मी त्यांना गेल्या काही दिवसांपासून फोन करत आहे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संपर्क करत आहे. मात्र, उत्तर मिळत नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा - वाहतूक नियम मोडल्याने चालकाला चक्क १ लाख ४१ हजारांचा दंड!
सध्या मंदी दिसून येते, माझ्या मतदारसंघात असलेल्या अनेक कंपन्यांमध्ये लोकांना नोकरीवरून काढले जात आहे. त्यामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत. निर्मला सीतारामन यांचा मी आदर करते. मात्र, त्यांनी केलेले विधान धक्कादायक आहे. आम्ही लोकसभेत अनेक सूचना करतो, ज्या सरकारच्या हिताच्या असतात. मात्र, त्यांची दखल घेतली जात नसल्याचे सुळे म्हणाल्या. ऑटोमोबाईल उद्योगात इतकी मंदी कधीच आली नाही, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये देखील मोठी मंदी असल्याचे सुळे यांनी सांगितले.
हेही वाचा - दोन आत्मासमर्पित नक्षलवाद्यांवर नक्षलवाद्यांचा गोळीबार ; एक ठार तर एक जखमी
सरकारच्या योग्य निर्णयाबद्दल आम्ही आडकाठी घालत नाही. स्मृती इराणींनी आणलेले बिल चांगलं होते तर आम्ही त्यांना समर्थन दिले. निवडणूक परिक्षेसारखी असते. परीक्षेत पास होण्यासाठी बसतो आणि मी तर मेरिटमध्ये येते, असेही त्या म्हणाल्या. लोकसभा निवडणूक होऊन तीन महिने झाले तरी सर्वांना बारामती लागते, माझी बारामती तितकी सुंदर आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला. आघाडीबाबत आमची बोलणी सुरू आहे. जयंत पाटील बाहेर आहेत. 13 आणि 14 तारखेला जयंत पाटील आणि काँग्रेस यांच्यासोबत बोलणी होईल आणि आघाडीबाबत जागावाटप फायनल होईल, असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.