ETV Bharat / state

Maratha Reservation : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवीगाळ केलेला मराठा तरुण 'ईटीव्ही भारत'वर; म्हणाला... - Maratha movement Ravindra Mote

Maratha Reservation : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आंदोलकाला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविद्र मोटे असं या आंदोलकाचं नाव असून, त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राणेंना फोन केला होता. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला होता.

Maratha Reservation
Maratha Reservation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 4:46 PM IST

रविंद्र मोटे यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एका युवकानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फोन केला. तेव्हा त्याला राणे यांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. हा युवक छत्रपती संभाजीनगर शहरातील असून, त्याचं नाव रविंद्र मोटे असे आहे. आपण फक्त केंद्र सरकारकडं आमची व्यथा मांडवी म्हणून संपर्क केला होता. मात्र, त्यांनी काहीच ऐकून घेतलं नाही. त्यांनी वयक्तिक नाही, तर पूर्ण समाजाला शिवीगाळ केली, हे सहन न होणार आहे, असं मत रवींद्र मोटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलं.

राणे यांनी केली शिवीगाळ : फुलंब्री तालुक्यातील शेतकरी असलेला रवींद्र मोटे यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फोन केला होता. आधी हा फोन राणे यांच्या 'पीए'नं उचलला. त्यानंतर नारायण राणे बोलत असताना रवींद्र मोटे यांनी 'जय शिवराय' असं म्हणलं, त्यावर राणे यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यावर रवींद्र यांनी 'साहेब जय शिवराय म्हणायला तुम्हाला लाज वाटते का?' असा सवाल केला. त्यावर नारायण राणे संतप्त झाले. नीट बोल, या फोन नंबरमुळं पुन्हा भेटशील असं म्हणत, त्यांनी 'कसले मराठी' असं वक्तव्य करत शिवीगाळ केली. त्यावर परत फोन केला असता, त्यांनी तो उचलला नाही. मात्र, या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

ऑडिओ तपासावा 'मी' तयार आहे - रवींद्र मोटे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप कोणीतरी मोडतोड करून प्रसिद्ध केली, असा आरोप केला गेला. मात्र, त्यावर कोणत्याही पद्धतीची चौकशी केली, तरी मी तयार आहे. ही ऑडिओ क्लिप खरी असून, त्यात कुठलीही मोडतोड नाही, असा दावा रवींद्र मोटे यांनी केला आहे. फोन करताना फक्त केंद्रीय मंत्री असल्याकारणानं तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर समाजाची व्यथा मांडू शकता. सर्व मराठा समाजाच्या नेत्यांना एकत्र घेत, आपण केंद्रसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडून समाजाला न्याय द्यावा, इतकीच इच्छा होती, असं मत रवींद्र मोटे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation Update: उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चेला यावे- मनोज जरांगे पाटील यांच आवाहन, नेत्यांविरोधात आंदोलकांचा संताप
  2. Mohit Kamboj : उद्धव ठाकरेंचे नवीन सल्लागार कोण? मोहित कंबोज यांनी थेटच सांगितलं...
  3. Rhul Narvekar Delhi visit : आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.