औरंगाबाद - अनेक ठिकाणी मला मराठी बोलावे असे, आग्रह धरला जातो तर मी खासदार झाल्यानंतर मला पत्रकारांनी सर्वात पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे तुम्ही शपथ कोणत्या भाषेत घेणार, यावर ते बोलताना म्हणाले मी महाराष्ट्राचा आहे मला याचा खूप अभिमान आहे. मराठी अस्मिता जोपासण्याचा बरोबरच विकासाची कास धरणे ही गरजेचे आहे.
पैठण विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे अधिकृत उमेदवार प्रल्हाद राठोड यांच्या प्रचार सभेदरम्यान त्यांनी विहामांडवा, आडुळ येथे सभेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, की एमआयएम हा पक्षा कुठल्याही एका जातीसाठी बांधलेला नाही. या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच जातीधर्माच्या उमेदवारांना तिकीट देऊन उभे करण्यात आले आहे. एमआयएम पक्षाबद्दल समाजात गैरसमज जातीयवादी असल्याचे पसरवण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर शहराचे वातावरण जातीवाचक होईल व दंगली घडतील, अशा प्रकारची अफवा पसरवण्यात आली होती. मात्र, एमआयएम पक्ष हा कुठल्याही जातीवादाला थारा देत नसून सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन विकास करण्यास कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - सावरकरांना भारतरत्न देण्याच्याआधी त्यांच्या पुतळ्याजवळचा रस्ता नीट करा - कन्हैया कुमार
तसेच पैठण तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी व संत भूमी असतानाही या तालुक्याचा गावाचा विकास झाला नसून आजही नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. तर रस्त्यावर आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत असल्याचे चित्र बघितल्याने हे फार गंभीर बाब असल्याचे जलील म्हणाले.
हेही वाचा - बाजारात शेती मालाला काय, पण तुम्हाला पण किंमत नाही - राज ठाकरे