ETV Bharat / state

मुलाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतना अनेकवेळा अडचणी येतात - पोलीस अधीक्षक - कोरोना

माझी आई पोलीस आहे. तीला रोज कर्तव्यावर जावे लागते. कोरोनामुळे तीचा जीवही धोक्यात जातो. त्यामुळे तुम्ही सगळे घरीच रहा व कोरोनाला हरवा. हात धुत रहा, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा मुलगा अयमनने केले.

edited news
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 10, 2020, 7:51 PM IST

Updated : May 10, 2020, 9:05 PM IST

औरंगाबाद - मातृदिवस आपल्या आईसाठी कृज्ञता व्यक्त करण्याचा खास दिवस असतो. आज कोरोनाच्या सावटाखाली अनेकांच्या माता आपले कर्तव्य बजावत आहे. कर्तव्य बजावत असताना आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना कोरोनाची सावलीदेखील शिवायला नको यासाठी या माता दक्षता घेत आहेत. अशीच एक माता म्हणजे औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील. पाटील यांना पाच वर्षाचा एक मुलगा असून तो सतत अनेक प्रश्न विचारतो. त्यावळे त्याच्या प्रश्नाला उत्तर देताान अनेकवेळा अडचणी येतात. पण, त्याला समजेल अशा पद्धतीने त्याचा समाधान करण्याचा परत्न करते, अशी भावना पोलीस अधक्षक मोक्षदा पाटील यांनी व्यक्त केल्या.

अयमन व मोक्षदा पाटील आपल्या भावना व्यक्त करताना

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आणि महापालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय या अधिकारी दाम्पत्याला अयमन नावाचा एक गोंडस मुलगा आहे. आई पोलीस अधिकारी असल्याने अयमन आणि मोक्षदा यांची भेट सहसा कर्तव्यावरुन काहीसा वेळ भेटल्यावरच होत असते. आई घरी आली की अयमन आईला घट्ट मिठी मारतो. अयमनने त्याच्या गोड आवाजात केलेला संवाद आईचा पूर्ण थकवा ताण घालवतो. कर्तव्यावर असताना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या मोक्षदा घरी गेल्यावर आई म्हणून आपल्या मुलाच्या प्रश्नांना उत्तरे देताना काही वेळा निरुत्तर होतात. कारण, अयमनला पडलेले प्रश्न हे त्याच्या वयाच्या पलीकडचे असतात.

कोरोनामुळे अयमनची थोडी घालमेल होते. कारण आई घरी आली की लगेच आईला मिठी मारता येत नाही. आई म्हणून मोक्षदा या देखील काहीशा निराश होतात. मात्र, घरी गेल्या की कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आधी त्या काळजी घेतात. अंघोळ करून तयार होईपर्यंत अयमन वाट पाहतो. त्यानंतर मग आईशी संवाद साधतो. माझे आई-बाबा कोरोनाशी दोन हात करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही ही घरी रहा आणि कोरोनाविरोधात लढा द्या, असे आवाहन अयमनने केले आहे.

आपल्या कुटुंबाला कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी जशी काळजी घेतात तशीच काळजी त्या आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची घेत आहेत. नागरिकांना बाधा होऊ नये यासाठी पोलीस कर्तव्य बजावत आहेत. याच पोलिसांची काळजी सध्या मोक्षदा पाटील घेत आहेत.

हेही वाचा - पैठणमध्ये तब्बल दिड महिन्यांनंतर अटी आणि शर्थीनुसार दुकाने सुरू

Last Updated : May 10, 2020, 9:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.