ETV Bharat / state

Aurangabad Minor Murder : औरंगाबादेत मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाने केली मामेभावाची हत्या - आत्येभावानेच मोबाईल न दिल्याच्या रागातून केली हत्या

काही दिवसांपूर्वी पैठण परिसरात एका मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या हत्येत धक्कादायक वास्तव समोर आले. अंकुश म्हैसमाळे (वय 16 वर्ष) असे मृत मुलाचे नाव असून, आत्येभावानेच मोबाईल न दिल्याच्या रागातून हत्या ( Minor Boy Killed Cousin For Mobile ) केल्याचे तपासात उघड झाले आहे. हा गुन्हा आता वाळूज पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

Aurangabad SP Office
औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय
author img

By

Published : Dec 9, 2021, 1:36 PM IST

Updated : Dec 9, 2021, 4:30 PM IST

औरंगाबाद - काही दिवसांपूर्वी पैठण परिसरात एका मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या हत्येत धक्कादायक वास्तव समोर आले. अंकुश म्हैसमाळे (वय 16 वर्ष) असे मृत मुलाचे नाव असून, मोबाईल न दिल्याच्या रागातून आत्येभावानेच हत्या ( Minor Boy Killed Cousin For Mobile ) केल्याचे तपासात उघड झाले आहे. हा गुन्हा आता वाळूज पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

अशी आहे घटना -

अंकुशला त्याच्या आजोबांनी नवीन मोबाईल फोन विकत घेऊन दिला. तसा फोन आपल्याकडे हवा अशी इच्छा त्याचा आत्येभावाची होती. त्यात अल्पवयीन आरोपीने मयत अंकुशला 30 नोव्हेंबर रोजी राजुच्या सांगण्यावरून त्याच्या सोबत ढोरकीन शिवारात गेला. त्याठिकाणी फोटो काढण्याचा बहाणा करत आरोपीने अंकुशला विहिरीत ढकलले, तो स्वतः सावरून वर येत असतांना त्याच्या डोक्यात दगड टाकून मोबाईल घेऊन पसार झाला. या प्रकरणाची नोंद पैठण औद्योगिक पोलिसांनी घेण्यात आली होती.

अपहरणाचा गुन्हा झाला होता दाखल -

1 डिसेंबर रोजी वाळूज पोलीस ठाण्यात धामोरी शिवारातील अंकुश प्रकाश म्हैसमाळे याचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अंकुशाचा मृतदेह पैठण औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 डिसेंबर रोजी विहिरीत सापडला होता. पोलीस तपासात हा खून त्याच्या अल्पवयीन आत्येभावानेच केल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी हा गुन्हा वाळूज पोलिसात वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा - Son Kills Father's Beloved In Chandrapur : वडिलांशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेची मुलाने केली हत्या

Last Updated : Dec 9, 2021, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.