ETV Bharat / state

संभाजीनगरमध्ये मराठी पाट्यावरून मनसे आक्रमक, दुकानांवरील इंग्रजी भाषेतील पाट्या फोडल्या - Marathi Board Issue

Marathi Board Issue : मराठी पाट्यांचा मुद्दा आता छत्रपती संभाजीनगरमध्येही गाजायला लागला आहे. (Vandalism of English boards by MNS) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दोन महिन्यांच्या आत राज्यातील सर्व आस्थापनांवरील नावाच्या पाट्या मराठीत लावणे अनिवार्य होते. (Maharashtra Navnirman Sena) मात्र, याचे पालन होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दुकानांवर इंग्रजीत लावलेल्या पाट्यांची तोडफोड केली.

Marathi Board Issue
Marathi Board Issue
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 6:24 PM IST

इंग्रजी पाट्यांची तोडफोड करताना मनसे कार्यकर्ता

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Marathi Board Issue : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दा हातात घेऊन हुडको परिसरातील काही दुकाने आणि हॉटेलच्या नावांचे फलक फोडून निषेध व्यक्त केला. मराठी पाट्या लावण्याबाबत दिलेली मुदत संपली असली तरी अजूनही काही आस्थापना किंवा हॉटेल मालकांनी मराठी भाषेत पाटी लावलेली नाही. त्याचाच राग व्यक्त करत दोन ते तीन ठिकाणी ही तोडफोड करण्यात आली. त्यात जावेद हबीब हेअर सलून आणि नामांकित हॉटेल सेव्हन ॲपल यांचा समावेश आहे. (vandalism of MNS in Chhatrapati Sambhajinagar)

नामांकित आस्थापनांच्या पाट्या फोडल्या : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यात मराठी पाट्या दुकानांवर लावण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. एक आठवड्यापूर्वी पुण्यामध्ये याच मुद्द्यावरून इंग्रजीत असलेल्या पाट्या फोडण्याचं काम मनसे कार्यकर्त्यांनी केलं होतं. त्यावेळी राज्यात लवकरात लवकर अशा पद्धतीनं मराठी पाट्या लावण्यासाठी मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी दुपारी हुडको कॉर्नर येथील इंग्रजी भाषेत लावलेल्या पाट्या मनसेच्या वतीने फोडण्यात आल्या. यात नामांकित आस्थापनांचा समावेश आहे. हुडको कॉर्नर येते असलेले हबीब या ब्रँडचे सलून आणि देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल चेन असलेले सेवन ॲपल या हॉटेलचा इंग्रजी भाषेत असलेला फलक फोडला. यापुढे इंग्रजी भाषेतील फलका बरोबर मराठी भाषेत देखील फलक लावण्यात आले नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय.

याआधी देण्यात आला होता इशारा : राज्यात व्यावसायिकांनी मराठी भाषेत फलक लावावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली होती. मराठी भाषेत पाटी असावी त्याबाबत न्यायालयाने देखील निर्देश दिले होते. त्यानंतर मराठी भाषेत दुकानाच्या नावाची पाटी लावण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपल्यावर देखील अनेक ठिकाणी इंग्रजी भाषेतच दुकानांची नावे लिहिलेले फलक दिसत होते. त्यावेळी मनसेच्या वतीने शेवटचा इशारा देण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गट शिवसेनेने देखील त्याबाबत निवेदन दिले होते. मराठी भाषेत दुकानांची नावे न लिहिणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. इतकचं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. राजकीय नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा दबाव असूनही अनेक दुकानांवर इंग्रजीमध्येच नाव लिहिलं असल्यानं मनसेच्या वतीनं आंदोलन सुरू करण्यात आलं. त्याचाच एक भाग म्हणून हुडको भागात तोडफोड करण्यात आली.

हेही वाचा:

  1. आळंदीत वैष्णवांचा मेळावा : घंटानाद आणि फुलांची उधळण करत संजीवन समाधी सोहळा पडला पार
  2. जालन्यात दिवसा ढवळ्या गँगवॉर? गजानन तौर यांची गोळीबार करुन हत्या
  3. कलम 370 रद्द करण्याचा निर्णय कायम, सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.