छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अनेक नेते, आमदार, खासदार आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी शिंदे गटाचे वैजापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरनारे यांनी आज विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं शिंदे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.
काय म्हंटलंय राजीनाम्यात : आमदार बोरनारे आपल्या राजीनाम्यात म्हंटले आहे की, राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज इतर मागासवर्गीय ओबीसी प्रमाणपत्र मागणीसाठी उपोषण व आंदोलन करीत आहे. परंतु त्यांना आजपर्यंत इतर मागासवर्गओबीसी प्रमाणपत्र मिळू शकले नाही. माझा मराठा समाजाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे. मी माझा विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा स्वखुशीनं देत असल्याचं बोरनारे यांनी पत्रात म्हटले आहे.
...त्यामुळं मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला : याविषयी प्रतिक्रिया देत रमेश बोरनारे म्हणाले की, खूप दिवसांपासून मराठा समाजाच्या तीव्र भावना आहेत, त्याचा आदर करून मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मी आज सकाळी सर्व जाती-धर्माच्या प्रमुख कार्यकर्त्यांना भेटून बोललो की, 'तुम्ही मला निवडून आणण्यासाठी खूप मोठी मदत केली आहे. मला तुम्ही निवडून आणलं. मात्र मराठा समाजाच्या भावनेचा आदर करून मी माझ्या आमदारकीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. तसंच सदरील राजीनामा ईमेल द्वारे विधानसभा सदस्यांना पाठवला आहे. मी स्वतः दुपारपर्यंत मुंबईत जाऊन राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द करणार आहे.
- मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाकडून तिसरा राजीनामा : नुकताच हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर आता मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाकडून तिसरा राजीनामा देण्यात आलायं.
हेही वाचा -
- All Party Leaders Meeting : आंदोलकांच्या संतापानंतर मुंबईत सर्वपक्षीय मराठा आमदारांची गोपनीय ठिकाणी बैठक, काय घेणार निर्णय
- Maratha reservation Live Updates Today: सर्व खासदार-आमदारांनी सामुदायिक राजीनामे द्यावेत-खासदार संजय मंडलिक यांच आवाहन
- Maratha Reservation Protest : बीडमध्ये संचारबंदीसह इंटरनेट सेवा बंदचा दुसरा दिवस, हिंसाचार प्रकरणी 49 जणांना अटक