ETV Bharat / state

पर्यावरण दिन विशेष : दोन वर्षांपूर्वी एकही झाड नसलेली शाळा नटली हिरवळीने - औरंगाबाद जागतिक पर्यावरण दिन विशेष न्यूज

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ममदापूर हे साडे नऊशे लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात १ ली ते ४ थी वर्गापर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेतील शिक्षकांनी गावातील तरुणांना मराठी शाळा व वृक्षारोपनाचे महत्व पटवून दिले. व त्यांना सोबत घेत शाळेच्या परिसरात वड, नारळ, मोरपंखी, गुलमोहर, बकुळ, शिसम, फायकस, बांबु, लिंबोनी अशी विविध प्रकारची झाडे लावली. आता ही शाळा आज हिरवाईने नटली आहे.

Aurangabad World Environment Day Special -mamdapur school look one green forests
ममदापूर शाळा बनली हिरवेगार जंगल
author img

By

Published : Jun 5, 2021, 1:20 PM IST

गंगापूर (औरंगाबाद) - तालुक्यातील ममदापूर या जिल्हा परिषद शाळेत दोन वर्षांपूर्वी एकही झाड नव्हते. शाळेने हिरवा शालू घालुन जशी नटली आहे. तीन शिक्षकांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोन वर्षात शाळेचे रुप पालटून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. शिक्षकांनी लोकसहभागातून शाळेचा कायापालट केला असून गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

आज शाळा नटली -

ममदापूर हे साडे नऊशे लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात पहिली ते चौथी वर्गापर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेतील शिक्षकांनी गावातील तरुणांना मराठी शाळा व वृक्षारोपनाचे महत्व पटवून दिले. त्यांना सोबत घेत शाळेच्या परिसरात वड, नारळ, मोरपंखी, गुलमोहर, बकुळ, शिसम, फायकस, बांबु, लिंबोनी अशी विविध प्रकारची झाडे लावली. आता ही शाळा आज हिरवाईने नटली आहे.

ममदापूर शाळा बनली हिरवेगार जंगल

घनवन प्रकल्पात शाळेचा समावेश -

मागील वर्षांत देशपातळीवर घनवन प्रकल्पातील १०० शाळेत ममदापुर निवड झाली होती. या घनवन प्रकल्पांतर्गत दोन गुंठे जागेत ५२ प्रजातीची ७०० देशी झाडे लावण्यात आली आहेत. यात ऑक्सिजन देणारी औषधी गुणधर्म असणारी पिंपळ, कडूनिंब, वड, चिंच, आवळा, बेहडा, कांचन, बेल, सिरस, कदंब, कळंब, शतावरी, शिसम, अर्जुन, बिबा, हिरडा, आपटा, पळस, उंबर, सिताफळ, करवंद, साग, जांभुळ आदी झाडे लावण्यात आली आहेत. येत्या तीन वर्षातच घनवन तयार होणार आहे. यातून शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण झाडांच्या विविध प्रजातीची माहिती शाळेतच मिळणार आहे.

घनदाट झाडांनी परिसरात पक्षांचा किलबिलाट -

कोरोनासारख्या महामारीतही शाळा बंद असल्याने येथील शिक्षकांनी या काळात गावातील कोविड सर्वेक्षण करत शाळेतील रंगरंगोटीचे काम केले. या कामामुळे शाळेच्या सौंदर्यात अधिकची भर पडली आहे. हा बदल करण्यासाठी मुख्यध्यापक संदीप काळे, सहशिक्षक रामदास वजरे, जयप्रभा काळे यांनी गावातील, तरुण व गावकऱ्यांच्या सोबत स्वत: वृक्षारोपण करत शाळेच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पाडली. तसेच या बाह्य बदलाबरोबरच मुलातही सकारात्मक बदल घडवून आणले.

हेही वाचा - world environment day शंभर टक्के विजेवर धावणार रेल्वेगाड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.